वाळवा : प्रतिनिधी : जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पुणे या संस्थेतर्फे “ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५” हा पुरस्कार जाहिर झाला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण २१ डिसेबर रोजी पुणे येथे ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को.ऑप.बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “सहकार मंथन २०२५” या कार्यक्रमात होणार आहे. (Vaibhav Nayakwadi)
यावेळी बोलताना वैभवकाका म्हणाले, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या सर्वांगिण विकासाचा उदात्त हेतू विचारात घेवून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी वाळवे या ग्रामीण भागात सहकारी तत्वावर १९८१ साली साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श पायवाटेचा अवलंब करुन कारखान्याने सुरुवाती पासून आज अखेर उच्चांकी साखर उतारा व ऊस दराची परंपरा कायम राखली आहे. (Vaibhav Nayakwadi)
हुतात्मा कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे, त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण केले आहे. तसेच कारखान्याने ऊसाला दिलेला उच्चांकी दर, साखर उत्पादनातील राखलेली गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था, कारखान्याचा व्यवस्थापनातील पारदर्शक कारभार आणि कारखान्याच्या आर्थिक विकासासाठी डिस्टीलरी, इथेनॉल, बायोकंपोस्टींग व बायोगॅस या प्रकल्पाची उभारणी व त्याचे यशस्वीपणे संचलन, कारखान्याने राबविलेल्या शेतकरी हिताच्या ऊस विकास योजना व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादनासाठीचे मार्गदर्शन, कारखान्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीस लागलेला मोठा हातभार व त्यामुळे झालेली स्थानिक अर्थव्यवस्थेची मजबूती या सहकार मुल्यावर आधारित प्रगतशील आणि समाजाभिमुख गुणांचा अभ्यास करुन हुतात्मा कारखान्याची या पुरस्कारासाठी ग्रीन वर्ल्ड पुणे या संस्थेने निवड केली आहे. कारखान्याच्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कारखान्यास आजपर्यत राज्य व देश पातळीवरील ४७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. (Vaibhav Nayakwadi)
कारखान्यास हा पुरस्कार मिळालेने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन रामचंद्र भाडळकर, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, फायनान्स मॅनेजर सचिन शिंदे, वर्क्स मॅनेजर गोपाळ आरखडे, चीफ केमिस्ट बाबूसो कोटबागी, मुख्य शेती अधिकारी सर्जेराव वावरे, डिस्टीलरी मॅनेजर नंदकुमार पाटील, संगणक इनचार्ज सुरेंद्र पाटील, एच.आर.मॅनेजर अजित माळी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Vaibhav Nayakwadi)