Umran Malik : दुखापतग्रस्त उमरानऐवजी साकारियाची निवड

Umran Malik

Umran Malik

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नव्या मोसमास सुरुवात होण्यापूर्वीच काही संघांना खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने त्याच्याजागी डावखुऱ्या चेतन साकारियाची संघात निवड झाली आहे. (Umran Malik)

मागील वर्षीच्या आयपीएलपासून दुखापतींनी २५ वर्षीय मलिकचा पिच्छा पुरवला आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघातर्फे मलिक केवळ एकच सामना खेळू शकला होता. असे असतानाही, कोलकाता नाइट रायडर्सने ७५ लाख मोजून उमरानला करारबद्ध केले होते. ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याने चर्चेत आलेल्या मलिकने भारतीय संघातर्फेही ८ टी-२० सामने खेळले आहेत. (Umran Malik)
विशेष म्हणजे मलिकच्या जागी निवड करण्यात आलेला चेतनही पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. चेतनने फेब्रुवारी, २०२४ मध्ये रणजी स्पर्धेमध्ये अखेरचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला होता. चेतन आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स या दोन आयपीएल संघांकडून खेळला असून त्याच्या नावावर १९ सामन्यांत २० विकेट आहेत. याशिवाय, कोलकाता संघाकडे एन्रिक नॉर्ट्जे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत. (Umran Malik)

डुप्लेसिस दिल्लीचा उपकर्णधार

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज फाफ डुप्लेसिसची आगामी आयपीएल मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीने भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली होती. डुप्लेसिसने मागील वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंज बेंगळुरू संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने लिलावात डुप्लेसिसला २ कोटी रुपयांना करारबद्ध केले. (Umran Malik)
यंदाच्या मोसमात दिल्ली संघाकडे लोकेश राहुलसारखा खेळाडू असतानाही त्यांनी उपकर्णधारपदासाठी ४० वर्षीय डुप्लेसिसला पसंती दिली. डुप्लेसिसने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४५ सामने खेळले असून त्याच्या नावावर ३५.९९ च्या सरासरीने ३,५७१ धावा जमा आहेत. मागील मोसमात त्याने बेंगळुरूकडून १६१.६२ च्या स्ट्राइक रेटने ४ अर्धशतकांसह ४३८ धावा फटकावल्या होत्या.

हेही वाचा :
अल्कारेझला हरवून ड्रेपर अंतिम फेरीत
परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!

Related posts

Gold price  : ‘सोनि’याचा वेलू गेला ‘लाखा’वरी

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी