Home » Blog » केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा; राहूल गांधींची मागणी

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा; राहूल गांधींची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Dismiss Union Minister Dharmendra Pradhan

नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. नीट पेपरफुटीने २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला, अशी टीकाही राहूल गांधींनी केली आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. एक्सवर राहूल गांधी यांनी पोस्ट केली आहे. नीट परीक्षेला बसलेल्या बावीस लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. तरीही मोदीजी एक शब्द बोलत नाहीत. धमेंद्र प्रधानांना ताबडतोब हटवा, नाहीतर स्वत: जबाबदारी घ्या. (Dismiss Union Minister Dharmendra Pradhan)

पोस्टमध्ये राहूल गांधीही व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये राहूल गांधी म्हणाले, “ नीटसाठी दोन वर्षे बावीस लाख विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांची मेहनत वाया गेली आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की परीक्षेच्या दोन दिवस आधी नीटचा पेपर व्हॉट्स अपवर शेअर केला जात होता. तो वितरित केला जात होता. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी पेपरफुटीशी माझा काहीही संबध नाही. समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या, ज्या त्यांनी कचरापेटीत फेकून दिल्या. ते म्हणाले, समितीत विरोधी पक्षाचे लोक बसले आहेत. त्याला काही अर्थ नाही. त्याची गरज नाही. सत्य हे आहे की तुम्ही भारताच्या गाभ्याला, त्यांच्या केंद्रालाच नुकसान पोहोचवले आहे. पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधानांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. त्यांना बडतर्फ करावे. जे दोषी असतील त्यांना पकडून तुरुंगात टाकावे. (Dismiss Union Minister Dharmendra Pradhan)

नीट पेपरफुटीमुळे झालेल्या आत्महत्याबद्दल शुक्रवारी केंद्र सरकारवर राहूल गांधींनी निशाना साधला होता. हे तरुण परीक्षेमुळे हरले नाहीत. एका भ्रष्ट व्यवस्थेने मारले आहेत. ही आत्महत्या नाही, ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे. (Dismiss Union Minister Dharmendra Pradhan)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00