Home » Blog » महापालिकांमध्ये कोण, कुठे, किती जागा लढतेय?

महापालिकांमध्ये कोण, कुठे, किती जागा लढतेय?

by प्रतिनिधी
0 comments
Parties contesting elections in 29 municipal corporations

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाने आधीच आपले अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यामुळे यावेळची निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. महापालिका निवडणुका केवळ स्थानिक सत्तेपुरत्याच मर्यादित नाहीत. तर या  या निवडणुकांमधून भाजप शहरी महाराष्ट्रावर आपले वर्चस्व कायम ठेवतो कामहाविकास आघाडी दमदार पुनरागमन करते काकी स्थानिक आणि प्रादेशिक घटक सत्ता संतुलनाला नवे स्वरूप देतातया प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

मुंबई महानगरपालिका.. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे यावेळी इथली लढत सर्वाधिक रंगतदार ठरणार आहे. मुंबई महापालिकेत याआधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखालील सत्ता होती, परंतु त्यांच्या पक्षाच्या पन्नासहून अधिक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. (Parties contesting elections in 29 municipal corporations)

ठाणे आणि कल्याण–डोंबिवली… ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. तसेच कल्याण–डोंबिवलीतही आतापर्यंत शिवसेना–भाजपा यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे लढत चुरशीची होणार का, याची उत्सुकता आहे.

पुणे आणि पिंपरी–चिंचवड..पश्चिम महाराष्ट्रातील या दोन महानगरपालिका भाजपचे बालेकिल्ले समजले जातात. आधी तिथे अजित पवार यांचे वर्चस्व होते. परंतु भाजपने ते कमी केले आहे. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. पुण्यात सर्व १६५ जागांवर भाजपा निवडणूक लढवत आहे. पिंपरी–चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळते आहे.

विदर्भ आणि मराठवाडा : काँग्रेस, AIMIM आणि वंचितचा प्रभाव..नागपूर महापालिकेत १५२ जागा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये इथे सर्वाधिक काळ भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तरीसुद्धा यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी मजबूत उमेदवार उभे केल्यामुळे लढत अधिक चुरशीची झाली आहे. (Parties contesting elections in 29 municipal corporations)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)… छत्रपती संभाजी नगरमध्ये AIMIM पक्ष एक प्रभावी राजकीय ताकद म्हणून पुढे आला आहे. इथे भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि AIMIM यांच्यात तिरंगी सामना पाहायला मिळत आहे.

अकोला, अमरावती, लातूर…या शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विशेषतः अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव निर्णायक मानला जात आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश…नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या भागांत भाजपची स्थिती मजबूत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि स्थानिक पक्षांमुळे निवडणूक एकतर्फी म्हणता येईल अशी स्थिती नाही. नाशिकमध्ये शिवसेना (UBT) – मनसे – काँग्रेस – राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा संयुक्त प्रयोग विशेष चर्चेत आहे.

मुस्लिमबहुल शहरांतील वेगळी समीकरणे… मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये AIMIM, समाजवादी पार्टी आणि स्थानिक आघाड्या सत्ता स्थापनेची किल्ली आपल्या हातात ठेवतात का, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही इथले राजकारण अधिक रंगतदार ठरणार आहे. (Parties contesting elections in 29 municipal corporations)

महापालिकानिहाय चित्र असे राहीलः

मुंबई महानगरपालिका (एकूण जागा – २२७)

महायुती : भाजपा + शिवसेना

भाजपा: १३७ जागा, शिवसेना (शिंदे गट): ९१ जागा

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

शिवसेना (UBT): १६३ जागा, मनसे: ५३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): ११ जागा

काँग्रेस + वंचित (एकत्र)

काँग्रेस: १४३ जागा, वंचित बहुजन आघाडी: ५० जागा, रासप: ५ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

९६ जागा

……………………..

नवी मुंबई महानगरपालिका (एकूण जागा – १११)

भाजपा: ११० जागा

शिवसेना (शिंदे गट): ११० जागा

काँग्रेस: १६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस: २० जागा, राष्ट्रवादी (शरद पवार): १९ जागा

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT): ५६ जागा, मनसे: २५ जागा, समर्थित उमेदवार: १४

……………………………………………….

वसई–विरार महानगरपालिका (एकूण जागा – ११५)

भाजपा + शिवसेना

भाजपा: ८१, शिवसेना: २७

बहुजन विकास आघाडी (BVA)

११३ जागा

(मनसेचे २ उमेदवार BVA च्या चिन्हावर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा पाठिंबा)

काँग्रेस: १०, राष्ट्रवादी: १५, शिवसेना (UBT): ८५

…………………………………………

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (एकूण जागा – १२२)

बिनविरोध निवड: २० जागा

(भाजपा – १४, शिवसेना (शिंदे) – ६)

शिवसेना + भाजपा

शिवसेना: ६२, भाजपा: ४०

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT): ५३, मनसे: ३५

राष्ट्रवादी: ३९

काँग्रेस + वंचित + राष्ट्रवादी (शरद पवार)

काँग्रेस: ५२, वंचित: १५, राष्ट्रवादी (शरद पवार): ३३

……………………………………..

उल्हासनगर महानगरपालिका (एकूण जागा – ७८)

भाजपा: ७८

शिवसेना + ओमी कलानी + साई पार्टी

शिवसेना + ओमी कलानी: ६७, साई पार्टी: ११

शिवसेना (UBT) + मनसे + काँग्रेस

शिवसेना (UBT): ४४, मनसे: १४, काँग्रेस: ३२

…………………………………………..

ठाणे महानगरपालिका (एकूण जागा – १३१)

भाजपा + शिवसेना

भाजपा: ४०, शिवसेना: ८७

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी (शरद पवार)

शिवसेना (UBT): ६२, मनसे: २८, राष्ट्रवादी (शरद पवार): ४१

काँग्रेस: ९५

वंचित: ६०

राष्ट्रवादी: ७५

………………………………………………….

भिवंडी–निजामपूर महानगरपालिका (एकूण जागा – ९०)

बिनविरोध: ६ जागा

भाजपा + शिवसेना

भाजपा: २६, शिवसेना: २०

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT): २८, मनसे: २

काँग्रेस: ५८

समाजवादी पार्टी: ५४

राष्ट्रवादी काँग्रेस: २४

राष्ट्रवादी (शरद पवार): ३७

AIMIM: १६, RPI (एकतावादी): ८, पीस पार्टी: २, कम्युनिस्ट पार्टी: २, वंचित: ९, जय हिंद पार्टी: ५, आप: ७, लोकहिंद पार्टी: ५, कोणार्क विकास आघाडी: ४ आणि शहर विकास आघाडी: ४

………………………………………………….

पनवेल महानगरपालिका (एकूण जागा – ७८)

महायुती

भाजपा: ७१, शिवसेना: ४, राष्ट्रवादी काँग्रेस: २, RPI (आठवले गट): १

महाविकास आघाडी

शेतकरी कामगार पक्ष: ३३, शिवसेना (UBT): १९, राष्ट्रवादी (शरद पवार): ७, काँग्रेस: १२, मनसे: २, समाजवादी पार्टी: १ आणि वंचित: १

………………………………………………….

मीरा–भाईंदर महानगरपालिका (एकूण जागा – ९५)

भाजपा: ८८

शिवसेना: ८१

काँग्रेस: ३२, राष्ट्रवादी काँग्रेस: ३३, राष्ट्रवादी (शरद पवार): १४, शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT): ५६, मनसे: ११

…………………………………..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (एकूण जागा – ११५)

भाजपा: ९२

शिवसेना (UBT): ९५

शिवसेना (शिंदे): ९६

काँग्रेस: ७१

राष्ट्रवादी: ७५

राष्ट्रवादी (शरद पवार): २३

AIMIM: ४७

वंचित: ६१

…………………………………………………

कोल्हापूर महानगरपालिका (एकूण जागा – ८१)

महायुती

भाजपा: ३६, शिवसेना: ३०, राष्ट्रवादी काँग्रेस: १५

महाविकास आघाडी

काँग्रेस: ७५, शिवसेना (UBT): ६

राजर्षी शाहू विकास आघाडी

राष्ट्रवादी (शरद पवार): २३, आम आदमी पार्टी: १४, वंचित बहुजन आघाडी: १२

जनसुराज्य: २९

………………………………………………

नागपूर महानगरपालिका (एकूण जागा – १५१)

भाजपा + शिवसेना

 भाजपा: १४३, शिवसेना: ८

काँग्रेस: १५१

राष्ट्रवादी: ९६, शिवसेना (UBT): ५६, मनसे: २२, राष्ट्रवादी (शरद पवार): ७९

………………………………..

सोलापूर महानगरपालिका (एकूण जागा – १०२)

महाविकास आघाडी

काँग्रेस: ४५, राष्ट्रवादी (शरद पवार): २०, शिवसेना (UBT): ३०, माकपा: ७

शिवसेना + राष्ट्रवादी

शिवसेना: ५१, राष्ट्रवादी: ५१

भाजपा: १०२

…………………………..

अमरावती महानगरपालिका (एकूण जागा – ८७)

काँग्रेस + शिवसेना (UBT)

काँग्रेस: ७५, शिवसेना (UBT): १२, राष्ट्रवादी (शरद पवार): १४

राष्ट्रवादी: ८७

भाजपा: ८७

शिवसेना (शिंदे): ६८

युवा स्वाभिमान पार्टी: ३४

AIMIM: २५

………………………………….

अकोला महानगरपालिका (एकूण जागा – ८०)

भाजपा + राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपा: ६२, राष्ट्रवादी काँग्रेस: १४

शिवसेना: ७३

महाविकास आघाडी

काँग्रेस: ४९, राष्ट्रवादी (शरद पवार): २४,

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT): ५५, मनसे: ९

वंचित: ५३, रासप: १, प्रहार: १, AIMIM: ३२

………………………………………….

नाशिक महानगरपालिका (एकूण जागा – १२२)

शिवसेना + राष्ट्रवादी

शिवसेना: १०२, राष्ट्रवादी: ४२

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी (शरद पवार) + काँग्रेस

शिवसेना (UBT): ७९, काँग्रेस: २२, राष्ट्रवादी (शरद पवार): ३०

मनसे: ३०

भाजपा: ११८

वंचित: ५५

………………………………….

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका (एकूण जागा – १२८)

भाजपा + RPI

भाजपा: १२३, RPI: ५

(भाजपाचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले)

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार)

राष्ट्रवादी काँग्रेस: ११८, राष्ट्रवादी (शरद पवार): ११

(काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत)

शिवसेना: ५७ उमेदवार, ३ समर्थित

शिवसेना (UBT): ५०, काँग्रेस: ४९, मनसे: १४

……………………………………….

पुणे महानगरपालिका (एकूण जागा – १६५)

भाजपा: १६५

शिवसेना: १२५

काँग्रेस + मनसे + शिवसेना (UBT)

काँग्रेस: ९८, शिवसेना-मनसे: १२५

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार)

राष्ट्रवादी काँग्रेस: १२२, राष्ट्रवादी (शरद पवार): ४३

…………………………….

चंद्रपूर महानगरपालिका (एकूण जागा – ६६)

भाजपा + शिवसेना

भाजपा: ५८, शिवसेना: ८

राष्ट्रवादी: ४०

काँग्रेस + जनविकास सेना

काँग्रेस: ६३, जनविकास सेना: ३

मनसे: २५

शिवसेना (UBT) + वंचित

शिवसेना (UBT): ३३, वंचित: ३३

राष्ट्रवादी (शरद पवार): ५५

……………………………………..

परभणी महानगरपालिका (एकूण जागा – ६५)

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार)

राष्ट्रवादी काँग्रेस: ५७, राष्ट्रवादी (शरद पवार): ८

काँग्रेस + शिवसेना (UBT)

काँग्रेस: २६, शिवसेना (UBT): ३९

भाजपा: ४०, शिवसेना: ३५, वंचित: ३९, AIMIM: १८, यशवंत सेना: १८, मनसे: ३

……………………………..

लातूर महानगरपालिका (एकूण जागा – ७०)

भाजपा: ७०

राष्ट्रवादी + रिपब्लिकन सेना

एकूण: ६० जागा

काँग्रेस + वंचित

काँग्रेस: ६५, वंचित: ५, राष्ट्रवादी (शरद पवार): १७, शिवसेना: ११, शिवसेना (UBT): ९ आणि AIMIM: ९

………………………….

मालेगाव महानगरपालिका (एकूण जागा – ८४)

भाजपा: २५, शिवसेना: २४, राष्ट्रवादी: ५

 शिवसेना (UBT) + राष्ट्रवादी (शरद पवार)

(मनसेचा पाठिंबा)

शिवसेना (UBT): ११, राष्ट्रवादी (शरद पवार): १२

काँग्रेस: २२, वंचित: ४

इस्लाम पार्टी + समाजवादी पार्टी

इस्लाम पार्टी: ४७, समाजवादी पार्टी: २०

AIMIM: ५७

……………………………

नांदेड–वाघाळा महानगरपालिका (एकूण जागा – ८१)

भाजपा: ७०

काँग्रेस + वंचित

काँग्रेस: ५८, वंचित: १४

 शिवसेना

नांदेड उत्तर: ४० (स्वतंत्र लढत)

नांदेड दक्षिण: २९ (राष्ट्रवादीसोबत युती)

राष्ट्रवादी काँग्रेस: ६३, AIMIM: ३५, शिवसेना (UBT): ३९

…………………………..

सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका (एकूण जागा – ७८)

भाजपा: ७८, शिवसेना: ६५, राष्ट्रवादी: ३३, काँग्रेस: ३२, राष्ट्रवादी (शरद पवार): २२, शिवसेना (UBT): ३२, मनसे: ६

………………………

जळगाव महानगरपालिका (एकूण जागा – ७५)

महायुती

भाजपा: ४६, शिवसेना: २३, राष्ट्रवादी: ६

शिवसेना (UBT) + राष्ट्रवादी (शरद पवार) + मनसे

शिवसेना (UBT): ३७, राष्ट्रवादी (शरद पवार): २१, मनसे: ५

काँग्रेस + वंचित: २९, समाजवादी पार्टी: ८, आप: ५, स्वराज्य शक्ती सेना: १२, AIMIM: ८

……………………………..

अहिल्यानगर महानगरपालिका (एकूण जागा – ६८)

महाविकास आघाडी

शिवसेना (UBT): २१, राष्ट्रवादी (शरद पवार): २७, काँग्रेस: १३

भाजपा + राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपा: ३२, राष्ट्रवादी काँग्रेस: ३२, शिवसेना: ४०, AIMIM: ६, बसपा: ४, सपा: ५, वंचित: ३, मनसे: ६

…………………………………..

धुळे महानगरपालिका (एकूण जागा – ७४)

भाजपा: ५८

शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस: ३९, शिवसेना: २९

 काँग्रेस + शिवसेना (UBT) + राष्ट्रवादी (शरद पवार) + मनसे

काँग्रेस: २१, शिवसेना (UBT): २९, राष्ट्रवादी (शरद पवार): १९, मनसे: ४, AIMIM: २१, समाजवादी पार्टी: ७, बसपा: ५, वंचित बहुजन आघाडी: ३ आणि जनता दल: १

…………………………………

जालना महानगरपालिका (एकूण जागा – ६५)

भाजपा: ६५

शिवसेना: ६३

काँग्रेस + शिवसेना (UBT) + राष्ट्रवादी (शरद पवार)

काँग्रेस: ४४, शिवसेना (UBT): १२, राष्ट्रवादी (शरद पवार): १२

राष्ट्रवादी काँग्रेस + मनसे

राष्ट्रवादी काँग्रेस: ५०, मनसे: ५

वंचित बहुजन आघाडी: २०, AIMIM: ३४, रासप: १

…………………………………..

इचलकरंजी महानगरपालिका (एकूण जागा – ६५)

महायुती

(राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत)

भाजपा: ५८, शिवसेना: ११, राष्ट्रवादी काँग्रेस: १२

शिवसेना (UBT): १८

शिव शाहू विकास आघाडी

एकूण: ६५ जागा

(काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार) + मनसे + माकपा + इतर पक्ष)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00