नवी दिल्ली : बांगला देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायधिकरणाने बांगला देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली. बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या घडामोडी झाल्याने बांगलादेशात मोठा हिंसाचार झाला होता. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पंतप्रधान हसिना यांनी राजीनामा देऊन देश सोडला. सध्या त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. (Death sentence for former prime minister)
शेख हसिना यांना न्यायालयाने मृत्यूदंडाशी शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यामुळे बांगला देशात तणाव वाढला आहे. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाका शहरासह प्रमुख शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शेख हसिना यांच्यावर निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Death sentence for former prime minister)
आंतरराष्ट्रीय न्यायधिकारणाने शेख हसिना यांच्या विरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे. त्यामध्ये शेख हसिना यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हसिना यांना शिक्षा ठोठावल्यावर त्यांच्या समर्थकांनी हिंसा व जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला तर थेट गोळीबार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लष्कराच्या तुकड्या आणि पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. (Death sentence for former prime minister)