कोल्हापूर : प्रतिनिधी : मुलगीच्या बारशापूर्वीच आईने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरातील राजारामपुरी, सायबर चौक काटकर माळ येथे घडली. मुलगी झाल्याने सासरच्या माणसांनी केलेला छळ, माहेरुन पैसे आणण्यासाठी केलेला तगादा यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी करत त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासरच्या पती, सासू,सासरा नणंद या चौघांना अटक केली आहे. (Mother commits suicide before daughter’s naming ceremony)
सायबर चौक काटकर पार्क येथील बंगल्यात अस्मिता प्रतिकसिंह काटकर (वय २३) या महिलेने रविवारी (दि.१२) राहत्या घरी फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अस्मिताचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला होता. एक महिन्यापूर्वी तिला मुलगी झाली होती. मुलगीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Mother commits suicide before daughter’s naming ceremony)
दरम्यान अस्मिताच्या आई संगिता अजित सरदेसाई (वय ४५, मुळ गाव रा. लाटगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर, सध्या राहणाऱ्या ओम रेसिडन्सी विठ्ठल मंदिर साबे दिवा, जि. ठाणे) यांनी सासरच्या लोकांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रतिकसिंह विरेंद्रसिंह काटकर (वय ३०), सासू मनिषा काटकर (५१), सासरे विरेंद्रसिंह विलासराव काटकर (५८), ऋतुजा काटकर (२५) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यात झालेल्या फिर्यादीनुसार अस्मिताने विवाहामध्ये डान्स केला नाही म्हणून तिला सातत्याने टोमणे मारले जात होते. तसेच माहेरुन पाच तोळे सोने, पाच लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता. अस्मिताच्या आई संगिता सरदेसाई यांनी वेळोवेळी ऑनलाईनवर पाच लाख सात हजार रुपये देऊनही पहिली मुलगी झाली म्हणून वेळोवेळी तिला टोमणे मारुन मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून अस्मिताने आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला आहे. (Mother commits suicide before daughter’s naming ceremony)