Trump Tariff : मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर  

Trump Tariff

वॉशिंग्टन : भारतातून आयात केलेल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के करण्याची लावण्याची घोषणा अमेरिकनेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. पण भारत अमेरिकेसोबत योग्य वागत नाही, असे ट्रम्प म्हणाले. मोदींची मैत्री असूनही अमेरिकेने आपले हित लक्षात घेऊन भारतावर टेरिफची आकारणी केली आहे. सर्वात जास्त ३४ टक्के कर चीनवर लादला आहे. अमेरिकेच्या टेरिफ लावण्याच्या धोरणामुळे जगभर खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद शेअरबाजारात उमटले आहे. भारतात महागाई वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Trump Tariff)

भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यावर डोनॉल्ड ट्रम्प म्हणाले, नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. पण भारत अमेरिकेबरोबर योग्य वागत नाहीत. अमेरिकेकडून भारतात निर्यात केलेल्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लावला जातो. आता त्याबदल्यात आम्ही त्यांच्यावर २६ टक्के कर लावत आहोत. (Trump Tariff)

दोन एप्रिल रोजी अमेरिका टेरिफचे धोरण जाहीर करणार असल्याने जगाचे लक्ष लागले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा करुन अमेरिका लिबरेशन डे म्हणून साजरा करणार आहे. अमेरिकेने सर्वात जास्त टॅरिफ चीनवर लावले आहे. चीनवर ३४ टक्के टॅरिफ लावले आहे. सर्वात कमी १० टक्के टॅरिफ युनायटेड किंगडमवर लावले आहेत. युरोपातील देशांना २० टक्के,  जपानला २४, दक्षिण कोरियाला २५, तर स्विर्त्झंलंडवर ३१ टक्के टॅरिफ लावला आहे. (Trump Tariff)

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. भारताकडून अमेरिकेत मौल्यवान खडे, वैद्यकीय साहित्य, कृषी साहित्य, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्यात होते. या वस्तूंच्या निर्मिती आणि यंत्र निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताच्या निर्यात धोरणाला फटका बसणार असून अमेरिकेसह अन्य देशांमध्ये नव्याने बाजारपेठा शोधण्यासाठी नवीन धोरण आखावे लागणार आहे. त्या दृष्टीने भारताने विविध देशांची बोलणी सुरू केली आहे. (Trump Tariff)

हेही वाचा :    

एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये नसेल

Related posts

Ghadi : ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

US relief: ट्रम्प यांचे घुमजाव