Thug Life box office : ‘ठग लाईफ’ने पहिल्याच दिवशी कमावले १७ कोटी

Thug Life box office

चेन्नई : कमल हासन आणि सिलंबरसन टीआर अभिनीत ‘ठग लाईफ’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजेच ५ जून रोजी भारतीय बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट मोठ्या अपेक्षांसह थिएटरमध्ये दाखल झाला आहे. विशेषतः ३८ वर्षांनंतर मणीरत्नम आणि कमल हसन एकत्र आले आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. (Thug Life box office)

तथापि, कमल हसनच्या याआधी प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन २’ पेक्षाही ही कमाई कमीच आहे. हा चित्रपटही मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. सॅकनिल्कच्या मते त्याने २५.२ कोटी रुपयांची कमाई केली होती. कन्नड भाषेवरील विधानामुळे कर्नाटकात ‘ठग लाईफ’ प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे कदाचित हे या चित्रपटाच्या कमाईतील घटीचे एक प्रमुख कारण आहे. ‘इंडियन २’ ने कर्नाटकात पहिल्या दिवशी ३.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीने पॉन्डिचेरीमध्ये सर्वाधिक ७०.२५% प्रेक्षकांची गर्दी पाहिली, त्यानंतर चेन्नईतील प्रेक्षकांनी गर्दी केली होती. (Thug Life box office)

तमिळ चित्रपटांपैकी या वर्षातील सर्वांत भव्यदिव्य असलेल्या ‘ठग लाईफ’ मध्ये कमल आणि मणिरत्नम यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या दोघांनी याआधी नायकन (१९८७) हा सिनेमा एकत्रित तयार केला होता. ए.आर. रहमान यांच्या संगीतासह, या गँगस्टर सिनेमात त्रिशा, नासेर, जोजू जॉर्ज, अभिरामी, भागवती पेरुमल, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, सान्या मल्होत्रा ​​आणि अली फजल यांच्यासह सिलंबरसन टी.आर. देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट कमलच्या राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मणिरत्नमच्या मद्रास टॉकीज यांची संयुक्त निर्मिती आहे.

हेही वाचा :
कमल हासन यांचा राज्यसभेसाठी अर्ज

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजेभोसले पॅनेलचा दणदणीत विजय; चित्रकर्मी पॅनेलचा धुव्वा