जगभरातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय

नवी दिल्ली : बीबीसीने २०२४ या वर्षातील जगभरातील १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय, कुस्ती महिला खेळाडू विनेश फोगाट आणि बेवारस महिलांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पूजा शर्मा यांचा समावेश आहे.

अरुणा रॉय

अरुणा रॉय यांनी १९६८ ते १९७५ या काळात इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम केले आहे. रॉय यांनी भारतातील ग्रामीण भागातील गरीबांचे अधिकार मिळवून देण्यासाठी गेली चार दशके काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मेगॅसेसे पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी मजदूर किसान शक्ति संघटन ची स्थापना केली आहे. माहित अधिकार कायदा अधिनियम लागू करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

विनेश फोगाट

विनेश फोगाट यांनी तीन वेळा ऑलिपिंकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी विश्व कुस्ती स्पर्धा, अशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदके मिळवून दिली आहेत. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृज भूषण शरण सिंह यांच्या विरोधात आवाज उठवला होता. नुकत्याच झालेल्या २०२४ मधील ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पोहचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. पण अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला अंतिम सामन्यात खेळू न दिल्याने तिचे पदक हुलकले. कुस्तीतून निवृत्ती स्वीकारत विनेश फोगाट यांनी राजकारणात उडी घेतली आहे.

पूजा शर्मा

सामाजिक कार्यकर्त्या पूजा शर्मा या बेवारस व्यक्तींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करतात. त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी या कामात उडी घेतली. भावावर त्यांनी एकट्याने अंत्यसंस्कार केले होते. पूजा यांनी पूजा ब्राइट द सोल फाउंडेशन ही संस्था स्थापन केली असून त्यांनी विविध धर्मातील चार हजार हून अधिक बेवारस मृतदेहावर अंतसंस्कार केले आहेत.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले