राधेश्याम जाधव यांना यंदाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील पुरस्कार

नगर : हिंदू वृत्तपत्र समूहातील हिंदू बिझनेसलाईनचे डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांना यावर्षीचा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग  आणि  सचिव उत्तमराव पाटील यांनी ही दिली. (Radheshyam Jadhav)

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी २२ डिसेंबरला तरवडी येथे कॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार आहे. राधेश्याम जाधव यांना त्यांच्या लेखन आणि संशोधनात्मक मांडणीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शेती अर्थकारण, शेतमजुरांचे प्रश्न, महिला शेतकरी आणि त्यांचे प्रश्न यांची सखोल मांडणी त्यांनी आपल्या लेखनातून केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील महिला शेतकरी आणि सकारात्मक संघर्ष हा त्यांच्या संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. पत्रकारिता आणि संवादशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीसाठी संशोधन केले आहे. (Radheshyam Jadhav)

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. ज्ञानेश महाराव, संजय आवटे, संध्या नरे-पवार, विजय चोरमारे, सचिन परब यांना यापूर्वी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ