सारंगींनी ओडिशात काय दिवे लावले?

नवी दिल्ली : भाजपचे खासदार प्रताप सारंगी नाटकी आहेत. कालही त्यांनी नाटक केले. ओडीशात असताना त्यांनी काय दिवे लावले?, असा सवाल करत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चचन यांनी भाजपच्या आरोपांचीही खिल्ली उडवली. (Jaya Bachchan)

सारंगी, राजपूत आणि नागालँडच्या महिला खासदार यांनी काल जो अभिनय केला तो मी माझ्या सिनेमा कारकिर्दीत केलेल्या कामगिरीपेक्षा कितीतरी सरस आहे. त्यामुळे ते ऑस्करसह सर्व पुरस्कारांसाठी पात्र आहेत. त्यांनी केलेला सर्व प्रकार म्हणजे एखद्या चित्रपटाच्या पटकथेसारखाच हा प्रकार होता, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, गुरुवारी आम्ही सभागृहाच्या दिशेने जात होतो. त्यावेळी एनडीएच्या या नेत्यांनी पायऱ्यांवर आमचा मार्ग रोखला. या परिस्थितीत जर एखाद्याला थोडा धक्का लागला तर ते पडणे स्वाभाविक आहे. (Jaya Bachchan)

भाजपकडून घाईघाईत बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप खासदारांना ‘जाणूनबुजून धक्काबुक्की’ केल्याचा आरोप भाजपने केला. शिवाय, नागालँडच्या भाजप खासदार फांगनॉन कोन्याक यांनीही राहुल गांधी यांच्यावर ‘दुर्व्यवहार’ केल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधी यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला. दरम्यान, इंडिया आघाडीच्यावतीने शुक्रवारी विजय चौक ते संसदेपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी, त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आला. (Jaya Bachchan)

राहुल गांधींविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दलही निषेध करण्यात आला. शाह यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिपणीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे नाटक भाजपने केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले