…तर मला हार्ट अटॅकच आला असता

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतात परतल्यानंतर चाहत्यांनी अश्विनचे जल्लोषात स्वागत केले. भारतात परतल्यानंतर त्याच्यासोबत असे काही घडले की, तर मला ‘हार्ट अटॅक’ आला असता असे त्याने विधान केले आहे. (R. Ashwin)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकांना फोन केले. यात चकित करणारी गोष्ट म्हणजे अश्विनला शुभेच्छा देण्यासाठी भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी केलेला फोन. अश्विनला शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आणि भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी फोन केला. याबद्दलची माहिती अश्विनने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

फोटो शेअर करत अश्विनने लिहले की, मला कोणी २५ वर्षांपूर्वी सांगितले की, माझ्याकडे एक स्मार्टफोन आहे, ज्याचा कॉल लॉग माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी असा असेल, तर तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता. मला फोन करून शुभेच्छा दिल्याबद्दल सचिन आणि कपिल पाजी यांचे मी आभार मानतो. (R. Ashwin)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत