महायुतीचा सत्ता स्‍थापनेचा दावा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी सत्ता स्‍थापनेचा दावा करणारे पत्र राज्‍यपाल सीपी राधाकृष्णन यांना सादर केले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी,  प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड उपस्थित होते  (Maharashtra Government)

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या (दि.५) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शानदार सोहळ्याची महायुतीने जोरदार तयारी केली आहे. शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. आझाद मैदानावर सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी भाजपाचे देशभरातील ज्येष्ठ नेते व अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

‘या’ मुख्यमंत्र्यांना आमंत्रण (Maharashtra Government)

योगी आदित्यनाथ : उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू : आंध्र प्रदेश
नितीश कुमार : बिहार
प्रेमा खांडू : अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा : आसाम
विष्णूदेव साय : छत्तीसगढ
प्रमोद सावंत : गोवा
भूपेंद्र पटेल : गुजरात
नायब सिंह सैनी : हरियाणा
मोहन यादव : मध्य प्रदेश
कॉनराड संगमा : मेघालय
भजनलाल शर्मा : राजस्थान
मानिक साहा : त्रिपुरा
पुष्कर सिंह धामी : उत्तराखंड

निमंत्रित संत महंत

नरेंद्र महाराज : नानीज
नामदेव शास्त्री : भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज
गौरांगदास महाराज : इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विद्ध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश.

‘एक है तो सेफ है’चे १० हजार टी शर्ट

विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘एक है तो सेफ हैं,’चा नारा दिला होता. आता महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा लिहिलेले दहा हजार टी-शर्ट भाजप कार्यकर्ते परिधान करणार आहेत. यावेळी मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. (Maharashtra Government)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ