looteri dulhan : ‘लुटारू नवरी’चे श्रीमंतांवर जाळे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जयपूर पोलिसांनी ३६.५० लाखाच्या दरोड्यात फरार असलेल्या ‘लुटारू नवरी’ला डेहराडून, उत्तराखंड येथून अटक केली. मॅरेज ॲपच्या माध्यमातून तिने जयपूरमधील ज्वेलर्सचा विश्वास जिंकला. लग्न केले आणि काही दिवसांनी दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. डीसीपी अमित कुमार यांनी सांगितले की, महिलेने यापूर्वीही श्रीमंतांना अडकवून लूटमार आणि ब्लॅकमेल केले आहे. जवळपास सव्वा कोटीची लूट तिने केली आहे. (looteri dulhan)

जयपूर पोलिसांनी उत्तराखंडमध्ये छापा टाकून जयपूरच्या प्रसिद्ध ज्वेलर्सला लुटणाऱ्या नववधूला अटक केली. लुटारू नवरीने जयपूरच्या एका प्रसिद्ध ज्वेलरशी मॅरेज ॲपद्वारे लग्न केले. कुटुंबाचा विश्वास जिंकल्यानंतर दरोडेखोर नववधूने ३६ लाखांचे दागिने आणि रोकड घेऊन पळ काढला.  आता पोलिसांनी तिला अटक केली असून तिची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोतवाडा येथील रहिवासी असलेल्या ज्वेलर्सने २९ जुलै २०२३ रोजी गुन्हा नोंदवला होता. त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने मुलांची काळजी घेण्यासाठी विवाह ॲपवर नोंदणी केली होती. यानंतर तो एका महिलेच्या संपर्कात आला. तिला भेटण्यासाठी तो डेहराडूनलाही गेला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी लग्न केले. या नववधूने  प्रथम कुटुंबाचा विश्वास जिंकला आणि अचानक एके दिवशी घरातील तिजोरीत ठेवलेले ३६.५०लाख किमतीचे दागिने आणि रोकड घेऊन पलायन केले. (looteri dulhan)

नववधूला डेहराडूनमधून केली अटक

डीसीपी अमित कुमार यांनी सांगितले की, नववधू उत्तराखंडच्या डेहराडूनची रहिवासी आहे. याआधीही तिने एका व्यावसायिक आणि इंजिनिअरची अशीच फसवणूक केली होती.  या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलीस वधूबाबत सातत्याने माहिती गोळा करत होते. काही धागेदोरे मिळाल्यानंतर मुरलीपुरा पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने उत्तराखंडमधील या दरोडेखोर वधूच्या घरावर छापा टाकला. तेथून पोलिसांनी तिला अटक केली.

मॅरेज ॲपद्वारे श्रीमंतांवर जाळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर नववधू विवाह ॲपवर घटस्फोटित, व्यापारी आणि श्रीमंत मुले शोधते. यानंतर त्यांच्याशी बोलून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेते. असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्याशी लग्न करायची. लग्नानंतर ती तीन-चार महिने त्याच्या कुटुंबात मिसळून त्यांचा विश्वास जिंकायची. त्यानंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ती घरात ठेवलेले लाखो रुपये आणि दागिने चोरून पळून जायची. (looteri dulhan)

तर करायची ब्लॅकमेल

फसवणूक झालेल्या कुटुंबाने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ती पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर छळाचा गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकमेल करत असे.

हेही वाचा :

Related posts

आयफेल टॉवरला आग

Jammu and Kashmir : लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू

निवडणूक नियमांच्या बदलांवर काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव