काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी सुरू

श्रीनगर : वृत्तसंस्था :  उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सुंदर गुरेझ खोऱ्यात सोमवारी सकाळी ताजी बर्फवृष्टी झाली. किलशे टॉप, तुलाईल आणि जवळपासच्या गावांसह खोऱ्याच्या वरच्या भागात नवीन हिमवृष्टी झाली.

हवामान खात्याने (एमईटी) दिलेल्या हवामान अंदाजानुसार ही बर्फवृष्टी झाली आहे. कमकुवत ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा सध्या जम्मू आणि काश्मीरवर परिणाम होत आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशाच्या विविध भागात हलका पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. त्याचा प्रभाव उद्या (ता. १२) सकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत गुरेझ व्हॅलीसह काश्मीर विभागाच्या उंच भागात जोरदार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हिमवर्षाव होण्याची शक्यता असलेल्या इतर भागात राझदान टॉप, सिंथन टॉप, पीर की गली, गुलमर्गचा फेज २ आणि पहलगाम आणि सोनमर्गच्या वरच्या भागांचा समावेश आहे.

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित