stock market collapsed भारतीय शेअर बाजाराला झटका

मुंबई : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी केलेल्या व्याजदर कपातीचे झटके सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराला बसले. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस बाजार आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली. (stock market collapsed )

बुधवारी फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात एक चतुर्थांश पॉइंटने कपात केली. या वर्षीचीही तिसरी कपात आहे. महागाई वाढल्याने पुढील वर्षी आणखी दोन कपात सुचवण्यात आली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. त्यामुळे फेडरलने पुढील वर्षीही व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला.(stock market collapsed )

फेडरलच्या व्याजदर कपातीलमुळे जागतिक आणि देशांतर्गत बाजारावर दबाव वाढला. त्यामुळे गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ८५ इतक्या नीचांकी पातळीवर घसरला.

गुरुवारी दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजार निर्देशांक कोसळले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,००० अंकांनी घसरला. दुपारी बारापर्यंत निफ्टीही २४,००० च्या खाली होता. बीएसई सेन्सेक्स ८८० अंकांनी म्हणजेच १.१० टक्क्यांनी घसरून ७९,३०१.७१ वर व्यवहार करत होता तर निफ्टी ५०२३० अंकांनी (०.९५ टक्के) घसरून २३,९६८.५० वर होता.(stock market collapsed )

फेडरल रिझर्व्ह बँकेने चारवेळा व्याजदर कपात होईल, असा अंदाज सप्टेंबरमध्ये व्यक्त केला होता. मात्र २०२५ मध्ये केवळ दोनवेळाच दर कपात करणार आहे. त्यामुळे डॉलर निर्देशांकाने दोन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. फेडरल आणखी दरकपात करणार असल्यामुळे रुपयासह उदयोन्मुख बाजारातील चलनांवर आणखी दबाव राहण्याची भीती या क्षेत्रांतील तज्ज्ञांना वाटते.

प्रिन्सिपल ॲसेट मॅनेजमेंटच्या चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट सीमा शाह म्हणाल्या की, या टप्प्यावर सावधगिरी आणि संयम राखण्याची गरज आहे. भविष्यात अधिक सावध पावले उचलावी लागतील.

हेही वाचा:

आंबेडकर, आंबेडकर.. आंबेडकर…; त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते सातवेळा स्वर्ग मिळाला असता!
रशियाने बनवली कॅन्सरवरील लस

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले