वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच अपघतात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. (Tamhini Ghat Accident)

आज (दि.२०) सकाळी १०च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात खासगी बसखाली सापडून तीन महिला आणि दोन पुरूषांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहे. तर तीन प्रवासी गंभीर आहेत. हे वऱ्हाड विश्रांतवाडी येथून महाड येथे लग्नासाठी चालले होते. जखमी प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात झाला होता. माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले.

मयतांची नावे

मृतांमध्ये ३ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे असून, एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.  (Tamhini Ghat Accident)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ