नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दर घसरणीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे देश आर्थिक अडचणींचा सामना करत असून केंद्रांच्या पोकळ घोषणांवर त्यांनी टीका केली आहे. चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ होईल असा दावाही त्यांनी केला आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पाँडेचरी राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.
राहूल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होऊन १०० च्या दिशेने जात आहे. त्याचबरोबर औद्योगिक इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे केवळ आकडे नाहीत तर आगामी काळातील महागाईचे स्पष्ट संकेत आहेत. (Fuel prices set to rise after the elections)
सरकार याला ‘सामान्य’ म्हणू शकते. पण वास्तव हे आहे की, उत्पादन आणि वाहतूक महाग होईल. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फटका बसेल. दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढतील. परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने बाहेर जाईल, ज्यामुळे शेअर बाजारावर अधिक दबाव येईल, असे राहूल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (Fuel prices set to rise after the elections)
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक कुटुंबाच्या खिशावर थेट आणि गंभीर परिणाम होणार आहेत. निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमतीही वाढतील. मोदी सरकारकडे ना दिशा आहे ना रणनिती. केवळ पोकळ घोषणांचा वर्षाव आहे. सरकार काय म्हणत आहे हा प्रश्न नाही. तर तुमच्या वाट्याला काय उरले आहे हा प्रश्न आहे. असे पोस्ट म्हटले आहे. (Fuel prices set to rise after the elections)