Home » Blog » Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

by प्रतिनिधी
0 comments
Kashinath Chaudhary

मुंबई : प्रतिनिधी : पालघरमध्ये जमावाने दोन साधूंची हत्या केल्यानंतर भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर भाजपने चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देत पक्षाची बाजू सावरुन नेण्याचा प्रयत्न केला. (Kashinath Chaudhary)

महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाच्या साथीने देशभर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होती. त्या काळात पालघर येथे जमावाने दोन साधुंची हत्या झाली केली होती. या घटनेनंतर तत्कालिन विरोधी पक्ष भाजपने उद्धव ठाकरे आणि सरकारवर गंभीर आरोप केले होते. साधू हत्याकांड प्रकरणी भाजपने काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच चौधरींना आता भाजपात प्रवेश दिल्यानंतर चोहोबाजूंनी विरोधकांनी टीका केली. (Kashinath Chaudhary)

आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत असे म्हटले आहे की पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ज्या काशीनाथ चौधरीवर आरोप केले त्यांना वॉशिंग मशिनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतले. मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होती असे म्हणायचे का? हेच भाजपचे ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. राजकारणासाठी भाजप कोणत्या थराला जाते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी भाजपला याचे उत्तर दयावे लागेल असे म्हटले आहे. (Kashinath Chaudhary)

चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर सारवासारव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. या संबधी मी माहिती घेतली आहे. मुळात या पक्षप्रवेशावरुन आमच्यावर जे लोक टीका करत आहेत ते कालपर्यंत का गप्प होते?. चौधरी कालपर्यंत त्यांच्याबराबरच होते. तेव्हा असे आरोप का केले नाहीत?. या प्रकरणाचा पूर्ण तपास केला आहे. या तपासातून काय समोर आले हे सर्वांनी पाहिले आहे. मला स्थानिकांनी सांगितले की सर्व गोष्टींची शहानिशा करुन पक्षप्रवेश केला आहे. फडणवीसांनी खुलासा केल्यानंतर भाजपने या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली आहे, असे पत्रक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे. (Kashinath Chaudhary)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00