नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास जोरदार सुरुवात झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन झाले असून त्यांनी ‘पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्या’ची मागणी केली आहे. झुरळाचे मुखवटे घालून आणि हातात तिरंगा झेंडा घेऊन युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Demand for Dharmendra Pradhan’s resignation raised by the ‘CJP’)
समाजमाध्यमावर सुरू झालेल्या क्रॉक्रोट जनता पार्टी ला इंटरनेटवर मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्यांचे देशासह जगभर फॉलोअर्स वाढले आहेत. नीट, सीयूईटी, सीबीएसई आणि एसएससी सारख्या परीक्षांमधील घोळाबद्दल कॉक्रोच पार्टीने चलो जंतरमंतरचे आवाहन केले होते. पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांचे आज सकाळी अमेरिकेहून भारतात आगमन झाले. दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी युवक जमा झाले होते. दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, व्यावसायिक जमले आहेत. अनेकांनी झुरळाचे मुखवटे घातले होते तर त्यांच्या हातात फुले होती. विद्यार्थी, पालकांकडून परीक्षातील घोटाळे आणि शिक्षण क्षेत्रातील अनियमतेबद्दल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र पधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Demand for Dharmendra Pradhan’s resignation raised by the ‘CJP’)
सीजेपीचे समर्थक पाकिस्तानी आहेत, अशी दावा भाजपने केला होता. तो कॉक्रोच पार्टीने फेटाळला आहे. ९४ टक्के फॉलोअर्स भारतातील आहेत. असे असताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू भारतीय तरुणांना पाकिस्तानी आहेत असे का संबोधत आहेत? असा सवाल पार्टीने केला आहे.
‘कॉक्रोच इज बॅक’ या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. शिक्षण मंत्र्यांना आम्ही निवडून पाठवले आहे. आमच्या टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो आहे. पण तुमच्या काळात कोट्यवधी युवकांचे भविष्य अंधकारात आहे. कॉक्रोच आ रहे है, धर्मेंद्र प्रधान जा रहे अशी पोस्ट केली आहे. (Demand for Dharmendra Pradhan’s resignation raised by the ‘CJP’)