Home » Blog » मुख्यमंत्री महोदय, आतातरी सांगा दहावी पास कधी झालात?

मुख्यमंत्री महोदय, आतातरी सांगा दहावी पास कधी झालात?

by प्रतिनिधी
0 comments
Honorable CM, when did you pass the 10th grade

`आपले पंतप्रधान फक्त एमए पास आहेत असं नाही, तर बीएसुद्धा पास आहेत हे मनाला सुखावणारं आहे. त्यांचं बीए पास असणं म्हणजे ते मॅट्रिकसुद्धा पास असणार याची खात्री देणारं आहे….` असं हिंदीतले प्रसिद्ध विडंबनकार कवी संपत सरल यांनी म्हटलंय. आता मोदीजींसाठी लिहिलेल्या या ओळी देशातल्या अनेक महाभागांना लागू होतात. त्यातलं ताजं ताजं चर्चेत आलेलं नाव म्हणजे बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी.

विजय चोरमारे

भारतीय जनता पक्ष कुठून कुठून एकएक नमुने हुडकून काढतो, याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. योगी आदित्यनाथ, हिमंता विश्व शर्मा यांच्या परंपरेतला हा नग आहे. त्याचं कर्तृत्व पाहिल्यानंतर एकूण मोदी-शाह यांच्या भारताच्या नवनिर्माणाच्या व्यापक दृष्टीची कल्पना येते.याच सम्राट चौधरी यांच्यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय जनता पक्षाच्या मनात वर्षानुवर्षे एक दुखरी बोच होती. ती म्हणजे उत्तरेतल्या सगळ्या राज्यांमध्ये सत्ता मिळवली. पण बिहारची जनता आपल्याला स्वीकारत नाही. त्यामुळे भाजपने नीतिश कुमार यांच्याशी जुळवून घेतलं. नीतिश कुमार यांनी अनेकदा अपमानित केलं, लाथाडलं तरी त्यांनी पुन्हा पुन्हा नीतिश कुमार यांचं नेतृत्व स्वीकारलं. नीतिश कुमार म्हातारे होण्याची वाट पाहिली. आणि त्यांना टप्प्यात आणून त्यांची शिकार केली. मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्यसभा सदस्यत्व महत्त्वाचे असल्याचे सांगून नीतिश कुमार यांनी राजीनामा दिला. आणि भाजपनं त्यांच्याजागी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री नेमलं. (Honorable CM, when did you pass the 10th grade)

८९ दिवस तुरुंगात

तर हे सम्राट चौधरी म्हणजे शकुनि चौधरी यांचे पुत्र. शकुनि चौधरी कोण तर ज्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत समता पार्टी स्थापन केली त्या संस्थापकांपैकी एक. नंतर ते लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातही होते. सम्राट चौधरींचा राजकारणातला प्रवेश १९९० मध्ये झाला. बिहार विधान परिषदेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार १९९५ मध्ये त्यांना एका राजकीय प्रकरणात ८९ दिवस तुरुंगात जावं लागलं होतं.हे प्रकरण काय होतं, हे जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी वेळोवेळी तपशीलानं सांगितलंय. नुसतं हे प्रकरणच नाही तर त्यातलं सम्राट चौधरी प्रकरणही रंजक आहे.प्रशांत किशोर यांनी म्हटलंय की, सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकून त्यांना अटक करायला पाहिजे. (Honorable CM, when did you pass the 10th grade)

हत्याकांड गुन्ह्यात आरोपी

तारापूर या ठिकाणी १९९५ साली सात लोकांची हत्या झाली होती. सगळे कुशवाह समाजाचे लोक होते. त्या हत्याकांडात हे राकेश कुमार उर्फ सम्राट कुमार मौर्य उर्फ सम्राट चौधरी आरोपी होते. त्यांना अटक करून तुरुंगातही टाकलं होतं. परंतु त्यांनी एक शाळेचा दाखला आणला. त्या दाखल्यानुसार त्यांची जन्मतारीख एक मे १९८१ अशी होती. म्हणजे १९८५ साली त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली तेव्हा त्या दाखल्यानुसार त्यांचं वय १५ वर्षे होतं. म्हणजे ते अल्पवयीन होते. निर्भया बलात्कार प्रकरणात आपण पाहिलंय की, कितीही गंभीर गुन्हा असला तरी अल्पवयीन आरोपीला सवलत मिळते. तशी या सम्राट चौधरी यांनाही सवलत मिळाली आणि अल्पवयीन असल्यामुळं ते तुरुंगातून सुटले.गंमत तर पुढं आहे. (Honorable CM, when did you pass the 10th grade)

हत्याकांडाच्या गुन्ह्यात कारवाई व्हायला हवी

प्रशांत किशोर यांनी निदर्शनास आणलं की, २०२०च्या विधानसभा निवडणुकीला सम्राट चौधरी यांनी जे अफिडेव्हिट दाखल केलं, त्यात त्यांनी आपलं वय ५१ वर्षे असल्याचं म्हटलंय. सम्राट चौधरी अफिडेव्हिट ला हापिडविट म्हणतात. तर तो मुद्दा नाही.  मूळ मुद्दा आहे की ताज्या माहितीनुसार १९९५ साली ते २६ वर्षांचे होते. याचा दुसरा अर्थ असा होतो की, १९९५ साली वयाचा खोटा दाखला दाखवून त्यांनी अल्पवयीन असल्याचा बनाव केला होता. हे सगळं कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये नोंद आहे. असा गुन्हेगारी पद्धतीचा खोटेपणा त्यांनी केला आहे. खून केला तेव्हा ते अल्पवयीन नव्हते, त्यामुळं त्यांच्यावर पुन्हा कारवाई व्हायला पाहिजे.

प्रशांत किशोर यांचं म्हणणं असं आहे की, हे होणार नसेल तर मग देशातील खुनाच्या आरोपातील सगळ्याच गुन्हेगारांना सोडा. प्रत्येकाला वेगवेगळा न्याय कशाला पाहिजे….बिहार सरकार, बिहारचे राज्यपाल, केंद्रसरकारकडे त्यांनी ही मागणी केली आहे.तुम्ही बिहार विधान परिषदेच्या वेबसाइटवर बघितलं तर सम्राट चौधरी यांची जन्मतारीख दिसते १६ नोव्हेंबर १९६८. (Honorable CM, when did you pass the 10th grade)

वेगवेगळ्या नावाने उमेदवारी अर्ज

दुसरं प्रकरण बघा.सम्राट चौधरी जेव्हा आरजेडीमध्ये होते तेव्हा जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी केलेले आरोप आहेत. त्यांनी म्हटलंय की, २००५ च्या निवडणुकीसाठी त्यांनी राकेश कुमार या नावानं अर्ज भरला. २०१०च्या निवडणुकीत सम्राट चौधरी उर्फ राकेश कुमार या नावानं अर्ज भरला. २०२०च्या निवडणुकीत सम्राट चौधरी या नावानं अर्ज भरला. (Honorable CM, when did you pass the 10th grade)

बोगस युनिव्हर्सिटीची डिग्री? २०२०च्या अर्जामध्ये आपण कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डीलिट् डिग्री घेतल्याचा दावा केला आहे. ही जगप्रसिद्ध कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी नव्हे. तर कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी नामक बोगस युनिव्हर्सिटी आहे. ही डिग्री सम्राट चौधरी यांनी नेमक्या कोणत्या नावाने घेतली आहे, हे स्पष्ट होत नाही.

एका वृत्तवाहिनीवर एक अँकर तेजस्वी यादव यांचं नववी उत्तीर्ण असणं सांगत असते. आणि तुमचं शिक्षण किती असं सम्राट चौधरी यांना विचारते. तर ते सांगतात की मी हपिडेव्हिट दिलंय. तिथं वाचा. तुम्ही तोंडानं सांगा म्हटल्यावर, एकदा ऑन रेकॉर्ड दिलं असताना पुन्हा पुन्हा का विचारता, असा प्रतिप्रश्न सम्राट चौधरी करतात.

मी जे बोलतो ते हाफिडेव्हिटमध्ये बोलतो

२०२०च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रशांत किशोर यांनी त्यांच्या दहावी नापास असल्याचा मुद्दा चर्चेत आणला. तेव्हा एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये त्यांना दहावी कुठल्या वर्षी पास झाला, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, हा कुणाचा प्रश्न आहे. प्रशांत किशोरचा प्रश्न आहे म्हटल्यावर मी व्यक्तिच्या प्रश्नावर उत्तर देत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी, आपण कामराज युनिव्हर्सिटीतून पीएफसी कोर्स केला असल्याचं सांगितलं. प्री फाऊडेशन कोर्स केल्याचं सांगितलं.दहावी पास झाला किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही. मी जे बोलतो ते हाफिडेव्हिटमध्ये बोलतो, असं ते म्हणाले.

सम्राट चौधरींच्या डोक्याला नेहमी पगडी बांधलेली असे. त्यावर त्यांनी एकदा सांगितलं होतं की, नीतिश कुमार यांचे वाळू माफिया, शराब माफियांशी साटेलोटे आहे. त्यांना पदावरून हटवलं जाईल,तेव्हाच आपण डोक्यावरची पगडी उतरवू. त्याच नीतिश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले. आणि त्यांच्याकडूनच मुख्यमंत्रिपदाची सूत्रंही घेतली.

सम्राट चौधरींचा राजकीय इतिहास

आता या सम्राट चौधरी यांचा थोडा राजकीय इतिहासही बघूया. सम्राट चौधरी आपले वडिल शकुनी चौधरी आणि अन्य नेत्यांसह १९९९ मध्ये राष्ट्रीय जनता दलात सहभागी झाले. १९ मे १९९९ रोजी राबडीदेवींच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. त्यावेळी पुन्हा त्यांच्या वयाचा मुद्दा आला आणि १६ नोव्हेंबर १९९९ रोजी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं. राज्यपाल भाजपचे असल्यामुळं ते शक्य झालं.

२००० साली ते आरजेडीकडून विधानसभेवर निवडून आले. सम्राट चौधरी यांनी निवडणूक अर्ज दाखल केला तेव्हा, ते अल्पवयीन होते, असा आरोप भाजपच्या सुशीलकुमार मोदी यांनी केला. प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयानं त्यांची निवड रद्द केली. २००४ च्या पोटनिवडणुकीत ते पराभूत झाले. पुढं ते जेडीयूमध्ये सामील झाले. जीतनराम मांझी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं. २०१७ मध्ये ते भाजपमध्ये सामील झाल्यावर वर्षभरातच त्यांना बिहार भाजपचं उपाध्यक्ष करण्यात आलं. २०२० च्या निवडणुकीत सम्राट चौधरी हेच भाजपचा प्रमुख चेहरा होते. जणू अमित शाह यांना आपला जत्रेत हरवलेला भाऊच बिहारमध्ये सापडला होता. सम्राट चौधरी यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं अमित शाह निवडणूक प्रचारात वारंवार सांगत होते.

आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर प्रशांत किशोर पुन्हा प्रश्न विचारताहेत, सम्राट चौधरी तुम्ही मुख्यमंत्री झालात. आतातरी सांगा तुम्ही दहावी पास आहात की नाही ? असलात तर कोणत्या वर्षी दहावी पास झालात? (Honorable CM, when did you pass the 10th grade)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00