4
कोल्हापूर : प्रतिनिधी : कॅनन कंपनीच्या नवीन पॉडक्शन प्रिटिंग मशिनचे प्रदर्शन कोल्हापुरात होणार आहे. हॉटेल सयाजी मारवा हॉल येथे २३ आणि २४ रोजी हे प्रदर्शन भरणार आहे, अशी माहिती स्थानिक डीलर फिक्समन सर्व्हिसेस कोल्हापूरचे संचालक स्वानंद ढाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Exhibition of printing machines in Kolhapur)
या प्रदर्शनाचे उद्घाटन ऑल इंडिया प्रिंटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय थोरवत यांच्या हस्ते आणि कोल्हापूर मुद्रक संघ उपाध्यक्ष अभिजीत पडवळे यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी मशिनचे थेट प्रात्यक्षिक होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वेळेत व्यावसायिक ग्राहकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन ढाळे यांनी केले. (Exhibition of printing machines in Kolhapur)