Sunrisers : सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

Sunrisers

Sunrisers

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा फटकावल्या. या धावा करताना सनरायझर्सने काही नवे विक्रम रचले, तर काही जुन्या विक्रमांशी बरोबरी केली. (Sunrisers)

२८६ – सनरायझर्स हैदराबादची ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही हैदराबादच्याच नावावर असून मागील मोसमात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ३ बाद २८७ धावा केल्या होत्या. रविवारी या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्यांना केवळ एक धाव कमी पडली. (Sunrisers)

४ – हैदराबादने आयपीएलमध्ये चौथ्यांदा अडीचेशे धावांचा टप्पा ओलांडला. टी-२० क्रिकेटमध्ये चारवेळा डावात अडीचशेहून अधिक धावा करणारा हैदराबाद हा एकमेव संघ आहे. त्याखालोखाल भारत आणि इंग्लंडमधील सरे या संघांनी प्रत्येकी तीनवेळा अडीचशेहून अधिक धावा केल्या आहेत. (Sunrisers)

३४ – या डावामध्ये हैदराबादकडून सर्व फलंदाजांनी मिळून एकूण ३४ चौकार मारले. टी-२० क्रिकेटमध्ये हा सर्वाधिक चौकारांचा विक्रम ठरला. यापूर्वी हा विक्रम मिडल्सएक्स संघाच्या नावावर होता. त्यांनी २०२३ मध्ये सरेविरुद्ध ३३ चौकार लगावले होते. आयपीएलमध्ये हैदराबादखालोखाल दिल्ली डेअरडेव्हिल्सने २०१७ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध डावात ३१ चौकार मारले होते.

१४.१ – हैदराबादने १४.१ षटकांत २०० धावा पूर्ण करताना आयपीएलमध्ये सर्वांत वेगवान सांघिक द्विशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी, २०१६ च्या आयपीएल मोसमात बेंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध १४.१ षटकांत द्विशतक झळकावले होते. (Sunrisers)

७६ – हैदराबादने राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या ४ षटकांमध्ये ७६ धावा वसूल केल्या. याबरोबरच आर्चर हा आयपीएलमधील आजवरचा सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. त्याने मोहित शर्माला मागे टाकले. मोहितने २०२४ च्या मोसमात गुजरात टायटन्सतर्फे खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७३ धावा दिल्या होत्या. (Sunrisers)

हेही वाचा :

न्यूझीलंडची विजयी आघाडी

Related posts

JD Vance Visit

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Congress Slams Bhandari

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी

Bhandari

Bhandari :२६/११ हल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात