द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा २-० असा पराभव केला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १० विकेट राखून विजय मिळवला. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताची पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. (WTC 2024-25)

पाकिस्तानवर विजय मिळवणे गरजेचे

दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ६३.३३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, ऑस्ट्रेलियन संघ ६०.७१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  या गुणतालिकेत भारतीय संघ ५७.२९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी विजय मिळवणे गरजेचे आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा मार्ग खडतर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी तीन सामन्यात विजय मिळवून मालिका ४-१ जिंकावी लागेल. या मालिकेत भारताचा पराभव झाल्यास भारतीय संघाला पाकिस्तान आणि द. आफ्रिका यांच्यातील निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. (WTC 2024-25)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत