कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे आज (दि.१०) दीर्घ आजाराने निधन झाले. एस. एम. कृष्णा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर जाहीर केला आहे. यासह कर्नाटक शासनाने उद्या (दि.११) सुट्टी जाहीर केली आहे. एस. एम. कृष्णा यांच्या सन्मानार्थ सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे. (SM Krishna)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, एस. एम. कृष्णा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे उद्या (दि.११) सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. बंगळूरमध्ये उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या मुळ गावी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. (SM Krishna)

एस. एम. कृष्णा यांनी अनेक मोठी पदे भूषवली होती. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल अशी वेगवेगळी पदे भूषवली होती. त्यांनी २००४ ते २००८ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. २००८ साली त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला.

२००९ साली ते तत्कालीने केंद्र सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्रीपद त्यांच्याकडे होते. २०१७ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एस.एम. कृष्णा हे एक असामान्य नेते होते. इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. एस. एम. कृष्णाजी हे एक विपुल वाचक आणि विचारवंत होते.”

– पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले