अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ पात्र

राजस्थान : झुंझुनू येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. आजच्या (दि.२३) सायंकाळच्या सत्रातील क्वालिफाईड मॅचमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने गतवर्षीचा विजेता संघ औरंगाबादवर ३५-२९ अशा गुण फरकाने विजय मिळवत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला.

अटीतटीच्या सामन्यात औरंगाबाद संघाने पाच मिनिटात आक्रमक खेळी करत शिवाजी विद्यापीठ संघावर लोन चढवत ११-९ अशी गुणांची आघाडी घेतली. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू अभिषेक गुंगेने केलेल्या उत्कृष्ट चढाया आणि त्याला विजय खोडकेने दिलेली साथ तर, कर्णधार वैभव राबाडे आणि साईप्रसाद पाटील यांनी केलेल्या अप्रतिम बचावाच्या जोरावर शिवाजी विद्यापीठ संघावर लोण चढवला.
सामन्याच्या मध्यंतरापर्यंत औरंगाबाद विद्यापीठ संघाकडे पाच गुणांची आघाडी होती. यानंतर मध्यंतरानंतर अभिषेक गुंगेने एकाच चढाईत बोनस व तीन

गुण असे चार पॉईंट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. तर, साईप्रसाद पाटील व कर्णधार वैभव दाभाडे यांनी केलेल्या अप्रतिम बचावामुळे शिवाजी विद्यापीठ संघाने औरंगाबाद वर पुन्हा लोन चढविला. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये शिवाजी विद्यापीठाकडे तीन गुणांची आघाडी होती भक्कम अशा बचावामुळे शिवाजी विद्यापीठ संघाने हा सामना सहा गुणांनी जिंकत बेस्ट ऑफ फोरमध्ये प्रवेश केला. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर अखेर झुंझुनू येथे होणार आहेत.

हेही वाचा :

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त