अविनाश साबळे, प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती पुरस्कार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरसह ४७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली.  पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत धडक मारून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला होता. परंतु, त्याला पदकाने हुलकावणी दिली होती.  दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना २०२२-२३चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.  (Shiv Chhatrapati Award)

कोण आहेत प्रदीप गंधे

प्रदीप गंधे यांनी १९८२ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरी व पुरुष सांघिक गटात कांस्यपदक पटकवले होते. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या जिजामाता पुरस्कार दिनेश लाड ( क्रिकेट), पवन भोईर( जिम्नॅस्टिक्स ), अनिल भोईल ( कबड्डी), शुभांगी रोकडे ( तिरंदाजी), राजाराम घाग ( दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक), व सुमा शिरूर ( नेमबाजी) यांची निवड केली गेली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंची यादी

अविनाश साबळे, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, कशीश भराड, गिरीश काते, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे.

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त