Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी हा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी शमी अद्याप पुरेसा तंदुरुस्त नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) म्हटले आहे. (Mohammed Shami)

‘बीसीसीआयचे वैद्यकीय पथक शमीच्या फिटनेसवर बारकाईने नजर ठेवून आहे. तो टाचेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असला, तरी त्याच्या डाव्या गुडघ्याला अद्याप हलकीशी सूज आहे. ही सूज दीर्घकाळ गोलंदाजी केल्यामुळे सांध्यांवर ताण पडून येत आहे,’ असे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. शमी मागील वर्षभर आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याने या वर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये बंगाल संघातर्फे पुनरागमन केले होते. त्यानंतर, तो सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही खेळला. तथापि, कसोटीत गोलंदाजी करण्यासाठी त्याला अद्याप काही काळ द्यावा लागणार असल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले. (Mohammed Shami)

ऑस्ट्रेलियातील पत्रकार परिषदांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माला सातत्याने शमीच्या संघातील समावेशासंबंधी प्रश्न विचारण्यात येत होते. शमीच्या फिटनेसबाबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगत रोहितने ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर हा प्रश्न बीसीसीआयकडे टोलवला होता. त्यानुसार, बीसीसीआयकडून सोमवारी शमीच्या फिटनेसबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. सध्या सुरू असणाऱ्या विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेतही शमीचा बंगाल संघामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. (Mohammed Shami)

हेही वाचा :

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली