‘शाहूं’चे कागल शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर बनविणार

बिद्री : प्रतिनिधी : करवीर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्यांची जन्मभूमी असलेला कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या सोयी सुविधा कमी असतानाही मेहनती शिक्षकांमुळे जिल्ह्यात अग्रेसर आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्यासह शाळांना मूलभूत सोयी सुविधा पुरवून शाहूंचे कागल शैक्षणिकदृष्ट्या राज्यात अग्रेसर बनवण्याचे ध्येय आहे. तसेच सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवू, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी केले.

सोनाळी (ता. कागल) येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.  ते म्हणाले, कागल गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघात अनेक गावांत प्राथमिक शाळांच्या इमारती गळक्या आहेत. मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. ई लर्निंगची सुविधा नाही. पुरेसे शिक्षकही उपलब्ध नाहीत. काही गावांत तर अंगणवाडीच्या चिमुकल्यांना देवळांचा आधार घ्यावा लागतो. पालकमंत्री विकास कामांसाठी सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणतात. मग शाळांची अशी दुरावस्था का? आम्ही कोणतेही संविधानिक पद नसताना १३० हून  अधिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक गावांमध्ये शाळा खोल्या बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृह, संर क्षक भिंत अशा मूलभूत बाबींसाठी निधी दिला. आमदारकीची एक संधी द्या शैक्षणिक दृष्ट्या जिल्ह्यात अग्रेसर असलेले छत्रपती शाहू महाराजांचे कागल राज्यात आदर्श बनवून दाखवितो.

शाहूंचा शैक्षणिक वारसा कृतीतून चालवला

प्रविण खोळांबे म्हणाले, दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांनी  ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी शिक्षण संकुलची स्थापना केली. समरजित घाटगे यांनी त्यामध्ये भर घालताना राजे अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शिष्यवृत्ती सराव परिक्षा, चित्रकला स्पर्धा, आदर्श शिक्षक पुरस्कार, अशा विविध उपक्रमातून शाहूंचा शैक्षणिक वारसा कृतीतून चालवला आहे. यावेळी शिवानंद माळी, संभाजीराव भोकरे, संदीप रोटे, सागर कोंडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी