Set Back to Shinde: शिंदेंच्या आणखी एका निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक!

Set Back to Shinde

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘कोल्ड वॉर’चे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. शिंदे यांच्या कार्यकाळातील एका निर्णयाला फडणवीस यांनी पुन्हा एकदा ब्रेक लावला आहे. आरोग्य विभागाच्या ३ हजार १९० कोटीच्या कामांना स्थगिती देण्यात आली असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.(Set Back to Shinde)

कामाचा कोणताही अनुभव नसताना पुण्यातील एका कंपनीला रुग्णालयातील यांत्रिकी साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तो निर्णय स्थगित करून त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अनियमिततेबद्दल कारवाई करण्यास सुरुवात केली. (Set Back to Shinde)

शिंदे सरकारच्या कार्यकाळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या, अँब्युलन्स खरेदीसह हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले होते. आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. यासाठी वार्षिक ६३८ कोटी रुपये तर ३ वर्षांसाठी एकूण ३, हजार १९० कोटींचा ठेका पुण्यातील एका खासगी कंपनीला ३० ऑगस्ट २०२४ रोजी देण्यात आला होता. (Set Back to Shinde)

शिंदेंच्या काळात केवळ भ्रष्टाचार : संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या काळात कामे झालीच नाहीत. झाला तो केवळ भ्रष्टाचारच. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते रोहित पवार यांनी दिली. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होते, हे साऱ्यांना माहिती आहे. त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो. फडणवीस हे सर्व थांबवणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही खा. राऊत आणि आ. पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?

 महायुतीच्या कारभारावर पवारांच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची नजर!

Related posts

Khandoba win : ‘खंडोबा’ अंतिम फेरीत

Burglary : पेट्रोल चोराकडून १४ घरफोड्या उघडकीस

Professor sucide : पत्नीचा खून करून प्राध्यापकाची आत्महत्या