उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी

मुंबई;  प्रतिनिधी : उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली. ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आहे. त्यानंतर ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सध्या रुग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. ( Uddhav Thackeray)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ