इंद्रधनुष्यमध्ये शिवाजी विद्यापीठाला  सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद 

कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University)

या युवा महोत्सवांमध्ये नृत्य, नाट्य, ललित कला, संगीत आणि वाङ्मय या कलाप्रकारात एकूण २९ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने भरघोस यश मिळविले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी इंद्रधनुष्य युवा महोत्सवांमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद तसेच संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. एकूण १३ बक्षिसे शिवाजी विद्यापीठाने मिळवली आहेत.  (Shivaji University)

शिवाजी विद्यापीठातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील निवडक ४२ विद्यार्थी, सात व्यावसायिक साथीदार, दोन संघ व्यवस्थापक, प्रशासकीय सेवक,  सांस्कृतिक समन्वयक, संचालक विद्यार्थी विकास असा एकूण ५५ सदस्यांचा संघ सहभागी झाला होता.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,  प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील.  व्यवस्थापन परिषद सदस्य व युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, स्वागत परुळेकर, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, माजी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, संचालक डॉ. टी. एम. चौगले, सांस्कृतिक समन्वयक दीपक बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कला विभागासाठी बबन माने, संग्राम भालकर, नृत्य विभागासाठी गणेश इंडीकर, आकाश लिगाडे, थिएटर विभागासाठी शंतनू पाटील, संदीप जंगम, मयुरेश पाटील, संगीत विभागासाठी ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, सुमंत कुलकर्णी, चैतन्य देशपांडे आणि वांड्मय विभागासाठी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवासाठी टीम मॅनेजर म्हणून हेमंत रकटे आणि डॉ. उज्वला बिरजे यांनी तर विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी विजय इंगवले, सौ. सुरेखा आडके यांचे सहकार्य लाभले.

 

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त