सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक

शेनझेन, वृत्तसंस्था : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या सहाव्या मानांकित जोडीने China Mastersस्पर्धेमध्ये शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या लक्ष्य सेनला मात्र पुरुष एकेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. (badminton)

सात्विक-चिराग या जोडीने ४७ मिनिटे रंगलेल्या लढतीमध्ये डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित किम अस्ट्रप आणि आंद्रेस स्कारूप रॅस्मसन यांच्यावर २१-१६, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात केली. या सामन्यात पहिला गेम जिंकण्यासाठी सात्विक-चिराग जोडीला फारसे श्रम करावे लागले नाहीत. दुसऱ्या गेममध्ये मात्र डेन्मार्कच्या जोडीने त्यांना कडवी लढत दिली. या गेममध्ये एकावेळी डेन्मार्कची जोडी १७-१६ ने आघाडीवर होती. परंतु, निर्णायक क्षणी केलेला ‘फाउल’ त्यांना महागात पडला आणि सात्विक-चिराग जोडीने हा गेम २१-१९ असा जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत सात्विक-चिराग यांची लढत जपानच्या ताकुरो होकी-युगो कोबायाशी आणि दक्षिण कोरियाच्या जिन याँग-सेओ सेउंग जे यांच्यातील विजेत्या जोडीशी होईल.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात डेन्मार्कच्या तृतीय मानांकित आंद्रेस अँटॉन्सनने लक्ष्य सेनचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला. आंद्रेसच्या वेगवान खेळापुढे लक्ष्यचा निभाव लागला नाही आणि ५३ मिनिटांपर्यंत झुंज दिल्यानंतर त्याला हार पत्करावी लागली.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत