Sanvidhan Bachao : काँग्रेसचे ‘संविधान वाचवा’ अभियान

Sanvidhan Bachao

मुंबई : प्रतिनिधी : राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी काँग्रेसच्यावतीने २६ जानेवारीला ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक मजबूत करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहीम सुरु केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिली. (Sanvidhan Bachao)

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षात मोठी मरगळ आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून देण्यासाठी पक्षाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, सेल व विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  सहभागी होणार आहेत. (Sanvidhan Bachao)

भाजपाकडून संविधान व संविधान निर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कट्टिबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महू येथे एका भव्य रॅलीने त्याची सांगता होणार आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली.

हेही वाचा :

 कॉम्रेड कृष्णा मेणसे कालवश

 रशियाकडून लढणाऱ्या केरळच्या तरुणाचा मृत्यू

Related posts

Rahul Slams Modi : महागाई रोखण्यात मोदी अपयशी

Tirupati : तिरुपती मंदिरामध्ये आग

Rooster Fight : कोंबड्यांच्या झुंजींवर कोटींचा सट्टा