सांगलीचे खा. विशाल पाटील-संजयकाका पाटील यांच्यात हमरीतुमरी

तासगाव; प्रतिनिधी :

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  विकासकामाबाबत श्रेयवाद रंगला आहे. नुकतेच केंद्रीय नितीन गडकरी यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना तासगावच्या  स्थानिक आमदारांच्या मागणीवरून रिंगरोडसाठी १७८ कोटी मंजूर केले असल्याचे सांगितले, तर माजी खासदार पाटील यांच्याकडून यासाठी आपण गेले दहा वर्षे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले गेले. यावरून  गेल्या काही दिवसांपासून आजी- माजी खासदारामध्ये सुरू असणारा वाद आज नगरपालिकेच्या कार्यक्रमात पुन्हा पाहायला मिळाला.

विशाल पाटील यांनी भाषणात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी, ‘‘ तुमच्या रिंगरोडचे १७८ कोटी मंजूर केले असल्याचे मला सांगितले असल्याचा उल्लेख केला. स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असून देखील भाजपकडून आणि पालकमंत्री यांच्याकडून विकासकामांसाठी चांगला निधी दिला. यामध्ये कुठेही राजकारण नाही यांचा आनंद आहे, असे  सांगितले. (Sangli News)

यानंतर संजयकाका पाटील, ‘तुम्ही काल खासदार झालाय, माझे आणि गडकरींचे जुने संबंध आहेत, मान देऊन बोलवलं आहे, इथं येऊन नौटंकी करू नका,’ असे विशाल पाटील यांना उद्देशून म्हणाले. यावरून संतप्त झालेल्या विशाल पाटील यांनी उठून मी तुमचा भाषणात अपमान केला नसल्याचे सुनावले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सभागृहात भाजप कार्यकर्त्यांनी खा. विशाल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुमनताई पाटील यांचीही उपस्थिती यावेळी होती. गोंधळानंतर  पाटील यांनी भाषण आवरते घेत पालकमंत्री खाडे यांना बोलण्यास निमंत्रित केले. या वादामुळे तासगाव शहरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा :

Related posts

सांगली : बसरगी (ता.जत) येथे जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

Thief arrested : एका वर्षांत चोरल्या ११ दुचाकी

CBI Raid : एक लाख ७० हजाराची लाच घेणाऱ्या बँक कायदा सल्लागाराला अटक