आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते आनंदी झाले होते. मात्र हे पैसे कुठून आले याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. (Sangli News)
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडे आठच्या सुमारास काही विद्यार्थी मार्गावरून ये-जा करत होते. यावेळी त्यांना ग.दि माँ पार्ककडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारील ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा दिसल्या. यावेळी त्यांनी ओढ्यात जाऊन पाहिले असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या. दरम्यान आज (दि.१९) तिथे रस्त्यावर बाजार भरत असल्याने तिथे व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. अनेकांनी ओढ्याच्या पाण्यात जाऊन शोध मोहिम राबवली. यावेळी त्यांना ओढ्यात पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या. (Sangli News)
दरम्यान हे पैसे कोठून येत आहेत? याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. एका प्लास्टिकच्या पिशवी मध्ये पैसे असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती. तर आज (दि.१९) परिसरामध्ये आठवडा बाजार असल्याने नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. ही बातमी आटपाडी शहरासह संपूर्ण तालुक्यामधून वाऱ्यासारखी पसरली. यामध्ये काही जुन्या व नवीन नोटा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :