Rohit Sharma : कसोटीतून माघार घेतलीय; निवृत्ती नाही

Rohit Sharma

Rohit Sharma

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी रोहित शर्माने संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. तथापि, रोहितने शनिवारी स्वत: याबाबत स्पष्टीकरण देऊन निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (Rohit Sharma)

“मी केवळ या कसोटीसाठी संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटीतून निवृत्ती जाहीर केलेली नाही. गोष्टी बदलतील, असा मला विश्वास आहे,” असे रोहितने स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, म्हणून मी या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला आयुष्य बदलत असते. धावांची खात्री कोणीच देऊ शकत नाही. परंतु, परंतु, माझा स्वत:वर आणि गोष्टी बदलू शकतात, यावर विश्वास आहे,” असेही रोहितने सांगितले. माझ्या निवृत्तीविषयीचा निर्णय हातात माइक, लॅपटॉप किंवा पेन घेतलेल्या लोकांकडून होऊ शकत नाही, अशी पुस्तीही त्याने जोडली. (Rohit Sharma)

सिडनी कसोटीपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीप्रमुख अजित आगरकर यांच्याशी झालेल्या चर्चेविषयीही रोहितने यावेळी माहिती दिली. मला धावा करता येत नाही आहेत. मी फॉर्ममध्ये नाही. हा महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची आपल्याला आवश्यकता आहे, असे प्रशिक्षक व निवडकर्त्यांना सांगितल्याचे रोहित म्हणाला. मी सिडनीत आल्यानंतर हा निर्णय घेतला. सिडनीत आल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी आमच्याकडे केवळ दोन दिवसांचा अवधी होता. कसोशीने प्रयत्न करूनही माझ्याकडून धावा होत नसतील, तर मी ते स्वीकारून संघाबाहेर राहणे योग्य असल्याचे मला वाटले. त्यानुसार, मी प्रशिक्षक व निवडकर्त्यांना माझा निर्णय कळवला. त्यांनीही माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. ‘तू इतकी वर्षे क्रिकेट खेळतो आहेस. तूच तुझ्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ शकतोस, असे ते म्हणाले,’ हे नमूद करण्यासही रोहित विसरला नाही. (Rohit Sharma)

हेही वाचा :

कसोटी रंगतदार स्थितीत

 

Related posts

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Kiran Rijiju

Kiran Rijiju: ‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय

Bumrah, Mandhana

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान