कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनावरील दोन ग्रंथाचे प्रकाशन १५ एप्रिल रोजी होणार आहे. डॉ. इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज (करवीर: दुसरे) या चरित्र ग्रंथाचे आणि डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी छत्रपती राजाराम महाराजांनी युरोप दौऱ्यावेळी स्वहस्ते लिहिलेल्या इंग्रजी डायरीचा मराठी अनुवाद असा संयुक्त ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या इतिहासातील अल्प परिचित असे एक नवीन पान लोकांच्या समोर येणार आहे. (Rajaram maharaj)
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंती १३ एप्रिल रोजी होत असून या निमित्ताने १५ एप्रिल रोजी मेन राजाराम हायस्कूल येथे सायंकाळी साडेपाच वाजता राजाराम महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने शिवाजी विद्यापीठ आणि व छत्रपती राजाराम महाराजांच्या जनक घराण्याचे विद्यमान सदस्य श्री बाळ पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Rajaram maharaj)
या कार्यक्रमामध्ये बाळ पाटणकर यांच्या संकल्पनेतून व शिवाजी विद्यापीठ प्रकाशित करत असलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनावरील डॉ. इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज (करवीर: दुसरे) या चरित्र ग्रंथाचे व डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी छ. राजाराम महाराजांनी युरोप दौऱ्यावेळी स्वहस्ते लिहिलेल्या इंग्रजी डायरीचा मराठी अनुवाद असा संयुक्त ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. (Rajaram maharaj)
या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर मार्गदर्शन करणार आहेत. (Rajaram maharaj)
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) याची कारकीर्द अल्प असली तरी त्यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पाहिले होते. त्यांनी युरोप दौरा करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय घेतला. युरोप दौऱ्यातभारताकडे परतताना फ्लॉरेन्स येथे झालेले आकस्मिक निधन झाले. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देण्याच्या हेतूने व त्यांच्यातील इतर पैलू दोन्ही ग्रंथाद्वारे अधिकाधिक लोकांच्या समोर मांडण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे व विद्यापीठाच्या छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्राचे समन्वयक मा. डॉ. अवनीश पाटील यांच्या सहकार्यातून हा संयुक्त ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव शिंदे व महाराजांचे जनक घराण्याचे सदस्य बाळ पाटणकर यांच्याकडून करण्यात आले आहे. (Rajaram maharaj)
हेही वाचा :