R Vaishali : बुद्धिबळपटू आर. वैशालीला ब्राँझ

R Vaishali

न्यूयॉर्क : भारताची बुद्धिबळपटू आर. वैशालीने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला गटात ब्राँझपदकावर नाव कोरले. मागील महिन्याभरात भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मिळवलेले हे तिसरे यश आहे. यापूर्वी भारताचा डी. गुकेश क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला होता, तर कोनेरू हम्पीने जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद मिळवले होते. (R Vaishali)

वैशालीने उपांत्यपूर्व फेरीमध्ये चीनच्या झू जिनरवर २.५-१.५ अशी मात करून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत मात्र तिला चीनच्याच जू वेनजूनकडून ०.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. वेनजूननेच अंतिम फेरीत चीनच्याच लेई तिंगजिएला ३.५-२.५ असे पराभूत करून महिला गटाच्या विजेतेपदावर नाव कोरले. भारताचे पाचवेळचे विश्वविजेते बुद्धिबळपटू आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी वैशालीचे ब्राँझपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. “वैशालीने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिला आणि तिच्या बुद्धिबळ कौशल्याला पाठिंबा दिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे आनंद यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट केले आहे. (R Vaishali)
या स्पर्धेच्या खुल्या गटामध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा इयान नेपोम्नियाची हे संयुक्त विजेते ठरले. या दोघांमध्ये विजेतेपदासाठी खेळवण्यात आलेल्या तीन सडन-डेथ लढतींनंतरही विजेता निश्चित न झाल्यामुळे त्यांना विभागून विजेतेपद मिळाले. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. (R Vaishali)

 

हेही वाचा :

बुमराहने अश्विनला मागे टाकले

दोन्ही संघांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

 

Related posts

KSA Football : ‘पाटाकडील’ला ‘दिलबहार’ने रोखले

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम