Pune accident : बापासह दोन मुलांना ट्रकने चिरडले

Pune accident

पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे शाळेत जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडले. अपघातात बापासह दोन मुलांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरुन आपल्या दोन मुलांना घेऊन वडील निघाले होते. त्याच वेळी एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. शिवम खेडकर, गणेश खेडकर, तन्मय खेडकर अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तन्मय तिसरीमध्ये तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता. (Pune accident)

शिक्रापूर-चाकण महामार्गावर सकाळी अपघात झाला. अपघात झाला असून शिक्रापूर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातसथळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेश खेडकर हे आपल्या दोन मुलांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी जात होते. पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तिघेही चिरडले. शाळेमध्ये पोहण्यापूर्वीच दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. (Pune accident)

हेही वाचा :

आयडी स्फोट; आठ जवान शहीद

विमान उंचीवर असतानाच लागली आग

 

Related posts

Shahu Chhatrapati Birthday : खासदार शाहू छत्रपतींवर शुभेच्छांचा वर्षाव

एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?

Salman’s House : सलमान ‘काचे’च्या घरात