PTM in final : ‘पाटाकडील’ ‘खंडोबा’ संघांत अंतिम सामना

PTM in final

PTM in final

कोल्हापूर : प्रतिनिधी : पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने दिलबहार तालीम मंडळाचा अर्धा डझन गोलने धुव्वा उडवत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शुक्रवारी (दि.१४) पाटाकडील आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे. पाटाकडीलने ६-० असा विजय मिळवताना त्यांच्या निवृत्त पावनोजी याने हॅटट्रीक साजरी केली. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (PTM in final)

आज बुधवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान पाटाकडीलला दिलबहार संघ लढत देईल असे वाटत असताना दिलबहारने या सामन्यात नांगी टाकल्याचे दिसून आले. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला पाटाकडील संघास पेनल्टी किक मिळाली. नबी खाने पेनल्टी मारत संघाचे खोत खोलले. त्यानंतर मैदानावर निवृत्ती पावनोजीचा खेला सुरू झाला. ३५ व्या मिनिटाला त्याने पहिला गोल केला. मध्यंत्तरास पाटाकडील संघ २-० असा आघाडीवर होता. (PTM in final)

उत्तरार्धातील खेळावरही पाटाकडील संघाचा वरचष्मा होता. ५२ आणि ६४ व्या मिनिटाला निवृत्ती पावनोजीने सलग दोन करत हॅटट्रीकची नोंद केली. ६५ व्या मिनिटाला स्ट्रायकर ओंकार मोरेने गोल केला. जादा वेळेत ८८ व्या मिनिटाला यशवंत कांबळेने संघाचा सहावा गोल केला. सहा गोलची घसघशीत आघाडी कायम राखत पाटाकडीलने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. (PTM in final)

गुरुवारी (दि.१३) सामन्याला सुट्टी असून शुक्रवारी दुपारी चार वाजता अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षिस वितरण होणार आहे. (PTM in final)

हेही वाचा :

शुभमन गिल ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

Related posts

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड