मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धनगर समाजाचे आंदोलन

मुंबई : राज्यात गेली अनेक वर्षे धनगर आरक्षणाबाबत आंदोलन सुरु आहे. आज (दि.८) आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईमधील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. (Dhangar Reservation)

सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तत्काळ काढावा अशी मागणी आंदोलकांतर्फे यावेळी करण्यात आली. तसेच अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले.

दुसरीकडे याच मुद्द्यावरून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले व  थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जाळीवरुन बाहेर काढले.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ