महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आणि शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमीपूजन, नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यासह महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींहून अधिक विविध प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (दि.९) झाले. (Narendra Modi )
मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आज पीएम मोदींच्या हस्ते झाले. एकाचवेळी दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे ७ हजार कोटी रुपये आहे याचेही व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन आज करण्यात आले.
Speaking at the launch of projects in Maharashtra, which will enhance infrastructure, boost connectivity and empower the youth.https://t.co/ZYiXGdRFDC
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
हेही वाचा :