plane crash: विमान क्रॅश; १७९ प्रवासी ठार

Plane

सेऊल : थायलंडची राजधानी बँकॉकहून परतणारे विमान दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात १७९  प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यापैकी १७५ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी केवळ दोघे बचावल्याचे स्पष्ट झाले आहे. (plane crash)

विमान सकाळी ८.३० सुमारास मुआन येथे उतरणार होते. परंतु हवाई वाहतूक नियंत्रकांनी संभाव्य पक्ष्यांच्या धडकेचा इशारा दिला. वैमानिकाला लँडिंग गियर कमी करता आला नाही. त्यानंतर एक अलर्ट जारी करण्यात आला. तथापि, मेडे अलर्टनंतर दोन मिनिटांतच विमान क्रॅश झाले, असे पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्रालयाचे विमान वाहतूक धोरण संचालक जू जोंग-वान यांनी स्पष्ट केले.(plane crash)

या अपघाताचे व्हिडीओ फुटेजमध्ये व्हायरल झाले आहेत. त्यात विमान रनवे वर वेगाने येणारे विमान धावपट्टी सोडते आणि क्षणाधार्ध कुंपणाच्या काँक्रिट भिंतील धडकते. तत्काळा आगीचे लोळ उठतात. धूर आणि आगीत विमान लपेटून जाते. त्याचा शेपटीचा भागही ओळखता येत नाही, असे त्यात दिसते.

जेजू एअरचे बोईंग ७३७-८०० हे विमान बँकॉकहून दक्षिण कोरियाला येत होते.(plane crash)

सकाळी ९:०० (स्थानिक वेळ) नंतर थोड्याच वेळात, कमी किमतीच्या वाहकाच्या विमानाला अडचणीचा सामना करावा लागला. कंट्रोल टॉवरने पायलटला लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नादरम्यान पक्ष्यांची संभाव्य धडक बसण्याचा इशारा दिला होता. काही मिनिटांनंतर, वैमानिकाने ‘मेडे’ चेतावणी दिली. विमानाने दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपघातग्रस्त झाले. १७५  प्रवाशांपैकी १७३ कोरियन तर दोन थाई नागरिक आहेत.

हेही वाचा :

काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत
स्पोर्ट्स शूज घातले म्हणून तिला कामावर काढून टाकले,

Related posts

KMC Water: कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

KLE Belgaum: कॅन्सर रुग्णांना धीर देण्याची गरज

Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात