जनतेचे आशीर्वाद हीच ताकद 

तासगांव; प्रतिनिधी :  स्वर्गीय आर आर आबांच्या राजकीय जडणघडणीत  गव्हाण व परिसराचे मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या लढाईत  जनतेचे  प्रेम आणि आशीर्वाद  हीच माझी मोठी ताकद आहे. आणि तुमची ताकदच मला लढण्याची प्रेरणा देत आहे. असे प्रतिपादन तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांनी गव्हाण येथील प्रचार सभेत केले.

यावेळी रोहीत पाटील म्हणाले, ‘माळरानावर सोन पिकवण्याची जिद्द असणाऱ्या गव्हाण व परिसरातील शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय आबांनी म्हैसाळ योजनेचे पाणी  या भागाला उपलब्ध करून देण्याची मोठी कामगिरी केली. एखादी सिंचन योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर  त्याचा किती मोठा परिणाम शेती व इतर व्यवसायावर होतो. हे आपण सगळेजण पाहतो आहे. आबांच्यावर जीवापाड प्रेम करणारे  या भागातील लोक मला विधानसभेला भरभरून मदत करतील असा विश्वास वाटतो.’

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील  यांनी पायाला भिंगरी लावत अखंड मतदार संघ पिंजून काढला आहे. गव्हाण ता. (तासगांव) येथे झालेल्या प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. जेसीबीमधून  फुले उधळत रोहित पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गव्हाण व परिसरातील शेतकरी व युवावर्ग  मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी