आउटफिट ॲण्ड पर्सनॅलिटी

वेशभूषा एक कौशल्य आहे. अनेक जण कपड्यांबाबत चोखंदळ असतात, मात्र कोणते कपडे कोणत्या कार्यक्रमावेळी वापरावेत, याचे भान असतेच असे नाही. लग्न समारंभ, मित्रांसोबत किंवा कौटुंबिक कार्यक्रम किंवा नियमित ऑफिससाठी कोणते कपडे वापरले तर व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसेल, याचे किमान भान बाळगले तर अनेक गोष्टी सोप्या होतात.

ऑफिससाठी वेशभूषा करणे हेही एक कौशल्याचेच काम आहे. तुम्ही नियमित कर्मचारी, क्लायंट किंवा ऑफिसमधील इतर समवयस्कांसमोर असता तेव्हा तुम्हाला तुमचा वावर आणि शैलीच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडणे आवश्यक ठरते. अर्थात, पोशाख हा त्या त्या कार्यालयीन वातावरणावरही अवलंबून असतो. अनेक कार्यालये कॅज्युअल ड्रेसिंगला परवानगी देतात, परंतु आम्ही कॉर्पोरेट कार्यालयात काम करताना पोशाखाबाबत फार चोखंदळपणा ठेवावा लागतो. मात्र बहुतेक वेळा होणाऱ्या किरकोळ चुका व्यक्तिमत्त्व बिघडवून टाकतात. त्यांपैकी ढोबळमानाने काहींचा विचार करता येईल.

ओव्हर-ॲक्सेसरीज

ओव्हर ॲक्सेसराइझिंगमुळे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वातील व्यावसायिक दृष्टिकोनावर किंवा त्याच्या दिसण्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे भरपूर ॲक्सेसरीजऐवजी किमान आणि मूलभूत ॲक्सेसरीज निवडा.

अयोग्य किंवा बॅगी कपडे टाळा

अयोग्य किंवा बॅगी कपडे परिधान केल्याने तुमचा संपूर्ण लूक बिघडून जातो. त्यामुळे तुम्ही ज्या कार्यालयात काम करत असता तेथील व्यावसायिक धोरणात फिट्ट बसू शकत नाही. त्यामुळे योग्य कपडे निवडा किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा ड्रेस शिवून घ्या.

स्ट्राँग फ्रॅगरन्स

नियमित फ्रॅगरन्स वापरणे ही चांगली सवय आहे, मात्र तो निवडतानाही भान ठेवले पाहिजे. स्ट्राँग फ्रॅगरन्समुळे तुम्हाला त्रास होत नसला तरी तुमच्या सहकाऱ्याला त्रास होऊ शकतो. चिडचिड किंवा डोकेदुखी होऊ शकते. खरे तर अनेक ठिकाणी ‘फ्रॅगरन्स फ्री’ झोन केलेले असतात. याचे भान ठेवणे गरजेचे असते. तसेच स्ट्राँग फ्रॅगरन्समुळे त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. म्हणून सौम्य दुर्गंधीनाशक किंवा परफ्यूम वापराचा विचार करायला हरकत नाही.

घट्ट कपडे

घट्ट कपडे परिधान केल्याने तुम्ही आकर्षक दिसत दिसत नाही; त्याऐवजी ते तुम्हाला बेढब बनवतात. अशा व्यक्तिमत्त्वाकडे कोण आकर्षित होईल? जे पुरुष जिममध्ये जातात त्यांना त्यांची बॉडी दाखवायला आवडेल, परंतु कार्यालयीन ड्रेस कोडमध्ये ते फिट्ट असत नाही. म्हणून कामाच्या ठिकाणी नीट पोशाखच असायला हवा.

कपडे नेहमीच नीटनेटके असायला हवेत. घाई झाली म्हणून सुरकुत्या पडलेला ड्रेस घालून ऑफिसला याल तर ते तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणम करणारे असेल. त्यामुळे कपड्यांबाबत नेहमीच दक्ष रहा. कपड्यातील ओंगळवाणेपणा किंवा ओबडधोबडपणा तुमच्या केवळ व्यक्तिमत्त्वाचाच भाग नसतो तर तो कार्यालयीन शिस्तीचा आणि त्या त्या कंपनीच्या व्यक्तिमत्त्चाचाही भाग असतो. याचे भान बाळगले तर तुमच्यातील व्यवसायिक व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.

Related posts

lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?

ganga and cancer: गंगेच्या पठाराला कॅन्सरचा घट्ट विळखा!

संतुलित आहार आणि आरोग्य