AIचे गॉडफादर ‘जेफ्री हिंटन’ यांना ‘नोबेल’; पुन्हा दिला ‘हा’ गंभीर इशारा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (AI) गॉडफादर अशी ओळख असलेल्या संशोधक जेफ्री हिंटन यांना जॉफ हॉफफिल्ड यांच्या समवेत फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ फिजिक्सच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी AIच्या गैरवापराबद्दल गंभीर इशारा दिला. (Geoffrey Hinton)

त्यांनी दिला ‘हा’ इशारा

हिंटन हे कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधक आहेत. ते म्हणाले, AIची रचना म्हणजे एखाद्या माणसाच्या मेंदूची कॉपी केलेली आहे. याला आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क असे म्हणतात. यावर हिंटन यांनी संशोधन केले आहे.

ते म्हणाले, ‘मानवी उत्क्रांतीमध्ये जे महत्त्व औद्योगिक क्रांतीचे आहे, तसेच AIचे असेल. यामुळे मानवाच्या बौद्धिक क्षमतांचा विकास होईल. माणसाला त्याच्यापेक्षा बुद्धिमान गोष्टींसोबत काम करण्याचा अनुभव नाही. यामुळे आपली उत्पादकता वाढेल. पण आपल्याला याच्या गैरवापराबद्दलही काळजी करावी लागेल. कदाचित गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरही जाऊ शकतात. असे असले तरी, आरोग्यसेवा, संशोधन आणि हवामान बदलावर मात करण्यासाठी आपल्याला AIची मदत घेता येणार आहे.’ (Geoffrey Hinton)

कोण आहेत जेफ्री हिंटन?

जेफ्री हिंटन हे कम्प्युटर सायन्स आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीमध्ये  काम करतात. मशीन लर्निंगच्या पुढचा टप्पा म्हणजे AI होय. यामध्ये बॅकप्रोपगेशन या संकल्पनेला  अधिक महत्त्व आहे.  या बॅकप्रोपागेशनचा शोध हिंटन यांनी लावला होता. तसेच न्यूरल नेटवर्कमध्ये त्यांनी मौलिक संशोधन गेले.

सुरूवातीच्या काळात हिंटन  अमेरिकेत संशोधन करत होते.  यानंतर ते कॅनडामध्ये स्थायिक झाले. २०१२ साली हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी Alex Net ही प्रणाली विकसित केली होती. फोटो ओळखू शकणारी ही प्रणाली त्या वेळी उपलब्ध प्रणालींपेक्षा ४० टक्के अधिक अचूक होती. (जेफ्री हिंटन)

जेफ्री हिंटन यांनी बनवलेले  Alex Net नंतर गुगलने विकत घेतले, त्याच वर्षी हिंटन गुगलमध्ये उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. २०२३मध्ये त्यांनी गुगलमधील नोकरीचा राजीनामा दिला होता. AIबद्दल खुलेपणाने मतं मांडता यावीत यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. ‘मी केलेल्या संशोधनाचा पश्चाताप नाही, पण दीर्घकाळाचा विचार केला तर AI अनियंत्रित होईल याची भीती वाटते,’ असे ते म्हणाले होते.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले