Nidhi Tewari : निधी तिवारी बनल्या पंतप्रधानांच्या स्वीय सचिव

Nidhi Tewari

Nidhi Tewari

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी कार्यरत असणाऱ्या निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तिवारी या २०१४ च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. (Nidhi Tewari)

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या नियुक्ती समितीने सोमवारी (३१ मार्च) यासंबंधीचे आदेश काढले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर तिवारी यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. तिवारी या मूळच्या मोदींचाच मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील मेहमूरगंज येथील आहेत. उत्तर प्रदेश प्रशासनामध्ये सहायक आयुक्तपदी (व्यावसायिक कर) कार्यरत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. २०१४ च्या निकालांमध्ये त्यांनी ९६ वा क्रमांक मिळवला होता. (Nidhi Tewari)

तिवारी यांची २०२२ मध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये दुय्यम सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर, त्यांना जानेवारी, २०२३ मध्ये उपसचिवपदी बढती मिळाली. त्यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत ‘परराष्ट्र व सुरक्षा’ विभागाचा कार्यभार होता व त्या थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होत्या. त्यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयामध्येही काम केले आहे. पंतप्रधानांच्या स्वीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर तिवारी यांना ‘लेव्हल १२’ स्तराचे वेतन असून ते साधारणत: मासिक २ लाख रुपये इतके असेल. (Nidhi Tewari)
सध्या पंतप्रधानांचे स्वीय सचिव म्हणून विवेक कुमार आणि हार्दिक सतीशचंद्र शाह हे दोघे अधिकारी काम पाहतात. फेब्रुवारीमध्येच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांता दास यांची मोदींचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रमोद कुमार मिश्रा हे २०१९ पासून पंतप्रधानांचे पहिले प्रधान सचिव आहेत.

हेही वाचा :
६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले
रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

Related posts

Sangram Thopate

Sangram Thopate: काँग्रेसला धोपटून संग्राम थोपटे भाजपमध्ये

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Topate

Topate : काँग्रेसमध्ये निष्ठेचे फळ मिळाले नाही