Home » Blog » ट्रकची कारला धडक; तीन ठार

ट्रकची कारला धडक; तीन ठार

by प्रतिनिधी
0 comments
Three killed in an accident near Gokak

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील मांडरे  कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  (Three killed in an accident near Gokak)

​ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील मांडरे कुटुंब सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते. प्रवासादरम्यान येरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि कारमधील  तिघांनी जागीच प्राण सोडले.  या अपघातात श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Three killed in an accident near Gokak)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!