नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी (१४ ऑगस्ट) सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या संघर्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Gallantry awards)
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय हवाई दलातील तेरा अधिकाऱ्यांना युद्ध सेवा पदक, २६ अधिकाऱ्यांना वायू सेना पदक आणि हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांसह दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर करण्यात आले.
वायू सेना पदकांचे मानकरी
ग्रुप कॅप्टन अंकुर हकीम
ग्रुप कॅप्टन मानव भाटिया
ग्रुप कॅप्टन यासिर फारुकी (फ्लाइंग)
ग्रुप कॅप्टन वरुण भोज (फ्लाइंग)
ग्रुप कॅप्टन अनुराज सिंग मिन्हास (फ्लाइंग)
ग्रुप कॅप्टन ओमर ब्राउन (वायु सेना पदक)
ग्रुप कॅप्टन दीपक चौहान (फ्लाइंग)
ग्रुप कॅप्टन कुणाल विश्वास शिंपी (फ्लाइंग)
विंग कमांडर रूपक रॉय (फ्लाइंग)
विंग कमांडर देवेंद्र बाबासाहेब औताडे (फ्लाइंग)(Gallantry awards)
विंग कमांडर मयंक पालीवाल (फ्लाइंग)
विंग कमांडर दीपक डोगरा (फ्लाइंग)
विंग कमांडर रविंदर कुमार (फ्लाइंग)
विंग कमांडर आदर्श गुप्ता (फ्लाइंग)
विंग कमांडर अभय सिंग भदोरिया (फ्लाइंग)
विंग कमांडर अमनदीप सिंग दिहोत (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर कौस्तुभ नलावडे (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर मिहिर विवेक चौधरी (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा (प्रशासन/फायटर कंट्रोलर)
स्क्वॉड्रन लीडर मालपती एन.व्ही. नवीन कुमार (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर शुभम शर्मा (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर अमन सिंग (फ्लाइंग)
स्क्वॉड्रन लीडर गौरव खोखर (फ्लाइंग)
फ्लाइट लेफ्टनंट ए. नवीन चंदर (प्रशासन/फायटर कंट्रोलर)(Gallantry awards)
सार्जंट सुरेंद्र कुमार (वैद्यकीय सहाय्यक)
कॉर्पोरल वरुणकुमार एस.
वीर चक्र पुरस्कार विजेते
ग्रुप कॅप्टन रणजीत सिंग सिद्धू
ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा
ग्रुप कॅप्टन अनिमेश पटनीम
ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा
विंग कमांडर जॉय चंद्र
स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार
स्क्वॉड्रन लीडर सिद्धांत सिंग
स्क्वॉड्रन लीडर रिजवान मलिक
फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर
सर्वोत्तमयुद्ध सेवा पदक
चार अधिकाऱ्यांना, ज्यात तीन वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांचा समावेश आहे, सर्वोत्तम युद्ध सेवा पदक प्रदान केले जाईल :
एअर स्टाफ एअर मार्शल नरनाडेश्वर तिवारी
वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश भारती
माजी वेस्टर्न नेव्हल कमांडर व्हाइस अॅडमिरल एसजे सिंग
याशिवाय, दोन वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचीही या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल तरुण सोबती यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.(Gallantry awards)
या मोहिमेदरम्यान उल्लेखनीय सेवेसाठी तेरा भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनाही युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात येईल. पुरस्कार विजेत्यांमध्ये एअर व्हाइस मार्शल जोसेफ सुआरेस, एअर व्हाइस मार्शल प्रजुअल सिंग आणि एअर कमोडोर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि ज्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली होती.